आजचा नकाशा वेगळाच असता, नेपाळ भारताचे राज्य होणार होतं; कोणी नकार दिला? धक्कादायक खुलासा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Nepal Protests: नेपाळमधील हिंसक आंदोलनाची आज जगभरात चर्चा आहे. भारताचा शेजारी असलेल्या या देशाबद्दल आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्रातून एक ऐतिहासिक धक्कादायक खुलासा झाला आहे. पंडित नेहरूंनी नेपाळच्या राजा त्रिभुवनांचा भारतात विलीनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला, अन्यथा आज नेपाळ भारताचे राज्य असते.
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल ईयर्स' या आत्मचरित्रात एक महत्त्वपूर्ण घटना समोर आली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की- जर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेपाळचे राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांचा प्रस्ताव स्वीकारला असता, तर नेपाळ आज भारताचेच एक राज्य असते.
advertisement
जागतिक परिस्थिती लक्षात घेता राजा त्रिभुवन यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करायचे होते आणि त्यांनी हा प्रस्ताव नेहरूंपुढे ठेवला होता.
प्रणब मुखर्जी यांनी पुस्तकात काय लिहिले?
प्रणब मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकाच्या 11 व्या प्रकरणात 'माय प्राइम मिनिस्टर: डिफरेंट स्टाइल्स, डिफरेंट टेम्परामेंट्स' (माझे पंतप्रधान: भिन्न शैली, भिन्न स्वभाव) या शीर्षकाखाली लिहिले आहे की- प्रत्येक पंतप्रधानांची कार्यशैली वेगवेगळी असते, भलेही ते एकाच पक्षाचे असोत. त्यांनी नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यपद्धतीतील फरकांवर जोर दिला.
advertisement
राजा त्रिभुवन यांच्या प्रस्तावाबाबत मुखर्जी लिहितात, नेपाळमध्ये राणांच्या राजवटीनंतर राजेशाही स्थापित झाली. नेहरूंची इच्छा होती की नेपाळमध्ये लोकशाही शासन असावे. याच संदर्भात ते पुढे लिहितात, विशेष म्हणजे नेपाळचे राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी नेहरू यांना नेपाळला भारताचे एक प्रांत बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र नेहरूंनी हा प्रस्ताव या आधारावर फेटाळला की नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि ते तसेच राहिले पाहिजे.
advertisement
नेहरू आणि इंदिरा यांच्या कार्यशैलीतील फरक
प्रणब मुखर्जी यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीची तुलना केली आहे. जर नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी असत्या, तर त्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घेतला असता, जसे त्यांनी सिक्कीमच्या बाबतीत केले, असे ते लिहितात. इंदिरा गांधी यांच्याच कार्यकाळात सिक्कीमचे भारतात विलीनीकरण झाले होते.
advertisement
नेपाळमधील सध्याची परिस्थिती
सध्या नेपाळमध्ये प्रचंड अशांतता आहे. सोशल मीडियावर बंदीच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनामुळे देशाची संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास आणि सरकारी कार्यालये जाळण्यात आली आहेत. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला असून, ते देश गेले आहेत. Gen-Z आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण नेपाळ धुमसत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 10:11 AM IST
मराठी बातम्या/Explainer/
आजचा नकाशा वेगळाच असता, नेपाळ भारताचे राज्य होणार होतं; कोणी नकार दिला? धक्कादायक खुलासा