Googleवर Chrome विकण्याची वेळ, एका छोट्या कंपनीच्या ऑफरने खळबळ; अरविंद श्रीनिवास यांनी लावली इतक्या कोटींची बोली

Last Updated:

Perplexity AI Google Chrome: फक्त ३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या Perplexity AI ने Google Chrome खरेदीसाठी तब्बल 34.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 3 लाख कोटी रुपये) ची ऑफर दिली आहे. अँटी-ट्रस्ट दबावामुळे Google ला क्रोम विकण्याची शक्यता वाढली असून टेक जगतात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

News18
News18
गेल्या काही दिवसांपासून Perplexity आणि Google Chrome यांच्यात जोरदार चर्चा सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे Perplexity AI ने Google च्या Chrome ब्राउझरला विकत घेण्यासाठी दिलेला 34.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.02 लाख कोटी रुपये) चा मोठा प्रस्ताव. Perplexity AI चे CEO अरविंद श्रीनिवास यांनी Google Chrome मध्ये स्वारस्य दाखवल्यापासून ते तंत्रज्ञान जगतात चर्चेत आहेत. Perplexity AI ची स्वतःची व्हॅल्युएशन 14 अब्ज असताना, त्यांनी दिलेली किंमत त्याच्या दुप्पटहून अधिक आहे. शिवाय क्रोम हे Google च्या सर्वात महत्त्वाच्या उत्पादनांपैकी एक आहे. त्यामुळे फक्त 3 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या एका AI कंपनीने दिलेल्या या ऑफरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Perplexity AI ची व्हॅल्युएशन Google पेक्षा कमी 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप Perplexity ने Google च्या लोकप्रिय ब्राउझर Google Chrome ला विकत घेण्यासाठी 34.5 अब्ज (सुमारे 3 लाख कोटी रुपये) चा प्रस्ताव दिला आहे. विशेष म्हणजे Perplexity ची स्वतःची व्हॅल्युएशन फक्त 14 अब्ज आहे. म्हणजेच कंपनीने आपल्या व्हॅल्युएशनपेक्षा दुप्पट किंमत देऊ केली आहे. यावर Perplexity ला विचारले असता त्यांनी सांगितले की, अनेक मोठे गुंतवणूकदार ही डील पूर्ण करण्यासाठी मदत करतील.
advertisement
Google ला क्रोम ब्राउझर का विकावा लागत आहे?
आता प्रश्न असा आहे की, Google ला क्रोम ब्राउझर विकण्याची वेळ का आली आहे. रिपोर्ट्सनुसार अमेरिकेत Google विरुद्ध सुरू असलेल्या अँटी-ट्रस्ट कारवाईमुळे कंपनीला आपला वेब ब्राउझर क्रोम विकण्यास भाग पाडले जाऊ शकते.
Google वर हा आरोप आहे
Google वर ऑनलाइन सर्चमध्ये आपली मक्तेदारी चालवल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी एका न्यायाधीशांनी म्हटले होते की, Google ऑनलाइन सर्चमध्ये बेकायदेशीरपणे आपली मनमानी करते. यानंतर अमेरिकन सरकारने सुचवले की कंपनीने क्रोम विकला पाहिजे आणि इतर कंपन्यांनाही त्यांच्या सर्च डेटाचा वापर करण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यामुळे भविष्यात अमेरिकन सरकार Google ला क्रोम विकण्यासाठी दबाव आणू शकते.
advertisement
क्रोममध्ये कोणताही बदल होणार नाही
Perplexity ने वचन दिले आहे की ते Chrome मध्ये कोणताही गुप्त बदल करणार नाहीत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, Perplexity ने हा प्रस्ताव मंगळवारी सकाळी Google ला पाठवला होता. कंपनीचे म्हणणे आहे की, या डीलसाठी त्यांना गुंतवणूकदारांकडून पैसे मिळतील.
हे पहिल्यांदाच घडले नाहीये की एखाद्या AI कंपनीने Google Chrome मध्ये स्वारस्य दाखवले आहे. यापूर्वी OpenAI, Yahoo आणि Apollo Global Management सारख्या Google च्या प्रतिस्पर्धकांनीही क्रोममध्ये रस दाखवला होता. तसेच डकडकगो (DuckDuckGo) च्या सीईओने याच्या संभाव्य जबरदस्तीने विक्रीची किंमत 50 अब्ज पेक्षा कमी नसेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
advertisement
कोण आहेत अरविंद श्रीनिवास ?
अरविंद श्रीनिवास यांचा जन्म 1994 मध्ये चेन्नई येथे झाला. त्यांनी IIT मद्रासमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथून कंप्यूटर सायन्समध्ये पीएचडी (Doctor of Philosophy) ची पदवी घेतली. त्यांच्या सुरुवातीच्या करिअरमध्ये त्यांनी प्रसिद्ध AI संशोधक योशुआ बेंजियो यांच्यासोबत काम केले.
advertisement
Google मध्ये होते इंटर्न
2019 मध्ये त्यांनी आपले करिअर रिसर्च सायंटिस्ट म्हणून सुरू केले. अनेक वर्षांच्या कामा नंतर 2022 मध्ये त्यांनी अमेरिकेत Perplexity AI कंपनीची स्थापना केली. जी आज एक प्रसिद्ध कंपनी बनली आहे. Perplexity AI सुरू करण्यापूर्वी श्रीनिवास OpenAI मध्ये AI रिसर्चर होते आणि त्यांनी Google आणि DeepMind मध्ये इंटर्नशिप देखील केली होती.
advertisement
2022 मध्ये केली होती Perplexity AI ची सुरुवात
2022 मध्ये डेनिस याराट्स, जॉनी हो आणि अँडी कोनविन्स्की यांच्यासोबत त्यांनी Perplexity AI ची सुरुवात केली. हे एक AI-Powered सर्च इंजिन आहे. जे रियल-टाइम माहितीचा वापर करून वापरकर्त्यांशी थेट संवाद साधते. Perplexity ची स्पर्धा ChatGPT, Grok आणि Google Gemini यांच्यासोबत आहे.
मराठी बातम्या/Explainer/
Googleवर Chrome विकण्याची वेळ, एका छोट्या कंपनीच्या ऑफरने खळबळ; अरविंद श्रीनिवास यांनी लावली इतक्या कोटींची बोली
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement