राहुल गांधींचा एक चुकीचा शब्द, ते वाक्य बोलले नसेत तर आज निकाल...; बिहारचा निकाल कुठे अन् कधी बदलला?

Last Updated:

Rahul Gandhi: छठपूजेवर केलेल्या ‘ड्रामा’ या एका विधानाने बिहारच्या निवडणुकीत महागठबंधनचा पाया हादरवला आणि संपूर्ण राजकीय वातावरण एका झटक्यात बदलून टाकले. सांस्कृतिक अभिमानाला धक्का लागल्यामुळे मतदारांनी थेट एनडीएच्या बाजूने निर्णायक कौल दिला.

News18
News18
पाटणा: बिहार विधानसभा निवडणूक 2025 चे निकाल एकतर्फी लागले. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तब्बल 201 जागांवर आघाडी घेतली होती, तर महागठबंधनला फक्त 50 जागांवर समाधान मानावे लागत आहे. सर्वाधिक धक्का बसला तो काँग्रेसला ज्यांना गेल्या वेळी मिळालेल्या 19 जागांवरून यंदा फक्त 5 जागांपर्यंत घसरण केली. हे जवळपास 74% ची ऐतिहासिक घसरण मानली जात आहे. आता बिहारच्या राजकारणात एकच प्रश्न विचारला जात आहे आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या छठपूजेवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाचा पूर्णकॅरेक्टर क्रॅशझाला का?
advertisement
बिहार फक्त भारतातील तिसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य नाही, येथे छठपूजा ही केवळ धार्मिक प्रथा नसून बिहारी अस्मिता, सांस्कृतिक ओळख आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. राज्यातील 89% लोक ग्रामीण भागात राहतात, जिथे छठपूजेमध्ये कोणताही हस्तक्षेप किंवा अवमान सहन केला जात नाही. त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी छठपूजेलाड्रामाम्हटल्यावर राजकीय समीकरणे पूर्णपणे उलटली.
advertisement
निवडणुकीच्या काळात हे नरेटिव्ह भाजपने जोरात पकडले. नरेंद्र मोदी आणि भाजपने या वक्तव्याचा असा वापर केला की तो थेटसंस्कृतीचा अपमानअसा सादर झाला. मोदी यांनी तर छठपूजेला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत बिहारी संस्कृतीला जागतिक ओळख देण्याचा संदेश दिला. त्यामुळे मोदी हेबिहारी अस्मितेचे रक्षकआणि विरोधकछठ विरोधी” असा सरळ संदेश जनतेपर्यंत पोहोचला आणि मतदारांच्या मनात खोलवर बसला.
advertisement
या निवडणुकीतील एनडीएच्या ऐतिहासिक विजयाने हे दाखवून दिले की बिहार फक्त विकासावरच नाही तर गौरव, मान-सन्मान आणि सांस्कृतिक ओळख यावरही मतदान करतो. 2014 पासून 2025 पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत बिहारचा मतदार ‘ब्रँड मोदी’सोबत उभा राहिला आहे. या वेळीही सामाजिक समीकरणे, विकास, आघाड्या यापेक्षा बिहारी अस्मिता आणि छठपूजेचा मुद्दाच जास्त प्रभावी ठरला.
advertisement
मोदी यांनी सहरसा येथे भाषणात म्हटले होते- काँग्रेस आणि आरजेडीचे शाही परिवार परदेशी सण साजरे करतात; पण छठपूजेबाबत म्हणतात की हा फक्त ड्रामा आहे. हा थेट राहुल गांधींच्या वक्तव्य आणि लालू यादवांनी टाकलेल्या हॅलोवीन व्हिडिओकडे इशारा होता. हा संदेश ग्रामीण भागात इतका खोलवर गेला की विरोधी पक्षांना त्याची भरपाईच करता आली नाही.
advertisement
निवडणूक अनेक घटकांवर ठरते- त्यात जातीय गणित, शासनाचा ट्रॅक रेकॉर्ड, विकासकामे, सामाजिक जोड. परंतु बिहारसारख्या भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बांधलेल्या राज्यात छठपूजेचा हलकासा अवमानसुद्धा राजकीय सुनामी बनू शकतो हे यंदा स्पष्ट झाले. काँग्रेसने अनवधानाने केलेली ही चूक महागठबंधनला फार मोठी किंमत मोजावी लागली.
advertisement
ग्रामीण, उच्च मतदान असलेल्या या राज्यात एवढ्या मोठ्या फरकाने पराभव होणे म्हणजे संस्कृतीचा अपमान राजकारणात किती घातक ठरू शकतो याचा जिवंत धडा आहे. महागठबंधन विशेषतः काँग्रेसने जर हा भावनिक सामाजिक नाडी वेळेवर ओळखला असता तर निकाल कदाचित वेगळा दिसला असता.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
राहुल गांधींचा एक चुकीचा शब्द, ते वाक्य बोलले नसेत तर आज निकाल...; बिहारचा निकाल कुठे अन् कधी बदलला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement