करोना Masks झाले ‘सायलेंट पॉइझन’, तुम्ही फेकलेल्या मास्कमधून निघतंय विष; ‘केमिकल टाइम बॉम्ब’च्या धोक्याने शास्त्रज्ञ घाबरले

Last Updated:

Disposable Face Masks Pollution: करोना काळात वापरलेले लाखो-करोडो मास्क आता ‘केमिकल टाइम बॉम्ब’ ठरत आहेत. संशोधनातून उघड झाले आहे की या मास्कमधून धोकादायक मायक्रोप्लास्टिक आणि रसायने बाहेर पडत असून गंभीर आजारांचा धोका वाढला आहे.

News18
News18
करोना काळात सर्वाधिक वापरली गेलेली वस्तू म्हणजे फेस मास्क होय. करोनापासून बचाव करण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावी मानले गेले. जगभरात दरमहा सुमारे 12,900 कोटी मास्कचा वापर झाला. पण वापर झाल्यानंतर बहुतांश लोकांनी मास्क कचऱ्यात किंवा उघड्यावर फेकून दिले. जे आता लोकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मोठा धोका बनले आहेत. एका नवीन संशोधनातून धक्कादायक खुलासा झाला आहे की- करोनाच्या काळात फेकून दिलेले लाखो-करोडो डिस्पोजेबल फेस मास्क आता धोकादायक रसायने बाहेर टाकत आहेत, ज्यामुळे गंभीर आजार पसरू शकतात.
advertisement
‘द गार्डियन’च्या अहवालानुसार नवीन संशोधनातून समोर आले आहे की- करोना काळात वापरून फेकलेले मास्क आता पर्यावरण आणि मानवांसाठी मोठा धोका बनले आहेत. प्लॅस्टिकपासून बनलेले हे मास्क तुटून मायक्रोप्लास्टिक आणि धोकादायक रसायने बाहेर टाकत आहेत, ज्यामुळे मानवी आरोग्य, प्राणी आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
करोना काळात मास्कची मागणी इतकी वाढली होती की- त्यांच्या विल्हेवाटीची कोणतीही प्रभावी व्यवस्था नव्हती. त्यामुळे ते कचऱ्यात किंवा उघड्यावर फेकून दिले गेले. हे मास्क मुख्यतः पॉलीप्रोपायलीन आणि इतर प्लॅस्टिकपासून बनलेले असतात. वापरानंतर हे मास्क कचरापेटीत किंवा उघड्यावर पडलेले दिसू लागले. उद्यानांमध्ये, नद्यांमध्ये, समुद्रकिनाऱ्यांवर आणि ग्रामीण भागांत हे मास्क आढळू लागले. जिथे ते तुटून पर्यावरणात मिसळले.
advertisement
इंग्लंडमधील ‘कवरेंट्री युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर ऍग्रोइकॉलॉजी, वॉटर अँड रेझिलिएंस’ (CAWR) च्या संशोधन टीमने हे तपासले की मास्क पाण्यात ठेवल्यावर ते किती प्रमाणात मायक्रोप्लास्टिक बाहेर टाकतात. त्यांनी विविध प्रकारचे नवीन मास्क २४ तासांसाठी शुद्ध पाण्यात ठेवले आणि नंतर पाण्याची तपासणी केली. प्रत्येक मास्कमधून मायक्रोप्लास्टिक बाहेर पडले, पण FFP2 आणि FFP3 मास्कमधून ४ ते ६ पट जास्त मायक्रोप्लास्टिक बाहेर पडले. हे तेच मास्क आहेत जे विषाणूपासून संरक्षणासाठी सर्वात जास्त विश्वसनीय मानले जातात. आता तेच सर्वाधिक धोकादायक ठरत आहेत. या मास्कमधून बाहेर पडलेल्या मायक्रोप्लास्टिक कणांचा आकार १० मायक्रोमीटरपासून २०८२ मायक्रोमीटरपर्यंत होता. पण १०० मायक्रोमीटरपेक्षा लहान कण पाण्यात सर्वाधिक आढळले. हे लहान कण मानवी शरीरात आणि पर्यावरणात प्रवेश करून अनेक आरोग्य समस्या निर्माण करू शकतात.
advertisement
या संशोधनातून आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. मास्कमधूनबिस्फेनोल बी’ नावाचे रसायन बाहेर पडत आहे. हे एक ‘एंडोक्राइन डिसरप्टर’ आहे, जे शरीरात इस्ट्रोजेनप्रमाणे कार्य करते. यामुळे मनुष्य आणि जीवांच्या हार्मोन प्रणालीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनांमध्ये या रसायनाचा संबंध कर्करोगाशी देखील जोडला गेला आहे. संशोधकांनुसार करोना महामारीच्या काळात वापरलेल्या सर्व मास्कांमधून एकूण १२८ ते २१४ किलो बिस्फेनोल बी पर्यावरणात पोहोचले आहे. ही मात्रा पर्यावरण आणि जीवांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. याच कारणामुळे तज्ञ या मास्कनाकेमिकल टाइम बॉम्ब’ मानत आहेत. हे रसायने कधीही आजार पसरण्याचे कारण बनू शकतात.
advertisement
या संशोधनाच्या प्रमुख लेखिका एना बोगुश म्हणतात की- आता आपल्याला फेस मास्कचे उत्पादन, वापर आणि विल्हेवाट यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. पर्यावरणासाठी सुरक्षित आणि पुनर्वापर करता येण्याजोगे (रिसायकल) पर्याय आपल्याला शोधावे लागतील. या धोक्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे देखील आवश्यक आहे. जेणेकरून ते चांगले पर्याय निवडू शकतील. करोना काळात आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेले मास्क आता पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका बनले आहेत. मायक्रोप्लास्टिक आणि रासायनिक प्रदूषणामुळे हे मास्क येणाऱ्या पिढ्यांसाठीही धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढणे ही आजची सर्वात मोठी प्राथमिकता असायला हवी. सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल फेस मास्कचे पर्याय विकसित करणे ही एक मोठी जबाबदारी आहे.
advertisement
मराठी बातम्या/Explainer/
करोना Masks झाले ‘सायलेंट पॉइझन’, तुम्ही फेकलेल्या मास्कमधून निघतंय विष; ‘केमिकल टाइम बॉम्ब’च्या धोक्याने शास्त्रज्ञ घाबरले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement