राजकारणातील नवे कनेक्शन, फायरमन लेडी खासदाराच्या जर्मनीतील 7 फेऱ्यांमुळे भारतात खळबळ

Last Updated:

Mahua Moitra Pinaki Mishra: तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा आणि बीजेडीचे माजी खासदार व सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील पिनाकी मिश्रा यांनी गुपचूपपणे जर्मनीत विवाह केला आहे. दोघांचे लग्न 3 मे रोजी पार पडले असून त्यांच्या जर्मनीतील एकत्र फिरतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

News18
News18
नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या चर्चेत असलेल्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजू जनता दलाचे माजी खासदार आणि सुप्रसिद्ध वकील पिनाकी मिश्रा यांच्याशी गुपचूप विवाह केला आहे. जर्मनीत 3 मे रोजी दोघांनी लग्न केल्याची माहिती टेलिग्राफच्या वृत्तातून समोर आली आहे. या विवाहाबाबत तृणमूल काँग्रेसने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
महुआ मोईत्रा यांचा हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी त्यांनी डेन्मार्कमधील फाइनान्सर लार्स ब्रोरसन यांच्याशी विवाह केला होता. मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला. तसेच त्या वकील जय अनंत देहदरई यांच्यासोबत तीन वर्षे नात्यात होत्या. पण त्या संबंधांत नंतर दुरावा निर्माण झाला. दरम्यान महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे स्वीकारल्याचे आरोप झाले होते. ज्यामुळे त्यांची खासदारकीही गेली होती.
advertisement
पिनाकी मिश्रा यांची देखील ही दुसरी लग्नगाठ आहे. त्यांनी याआधी संगीता मिश्रा यांच्याशी विवाह केला होता.त्या देखील एक नामांकित वकील होत्या.मिश्रा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले असून, दिल्ली विद्यापीठाच्या लॉ फॅकल्टीमधून एलएलबी केलं आहे.
राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असलेल्या मिश्रा यांनी 1996 साली पुरी लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री बृज किशोर त्रिपाठी यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. ते अनेक वर्षे पुरीचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव भाजपा उमेदवार संबित पात्रा यांनी केला.
advertisement
पिनाकी मिश्रा यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यांनी हॉटेल, रिसॉर्ट्स आणि इतर अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. 2014 मध्ये ते देशातील सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये गणले गेले होते. त्यावेळी त्यांची मालमत्ता सुमारे 140 कोटी रुपये होती. यात दिल्लीच्या गल्फ लिंक रोडवरील 47 कोटींचा बंगला आणि भुवनेश्वरमधील फॉरेस्ट पार्कमधील 10 कोटींचा बंगला समाविष्ट होता.
advertisement
सध्या दोघांचे जर्मनीत फिरतानाचे फोटोही व्हायरल होत आहेत. मात्र त्यांनी या विवाहाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
राजकारणातील नवे कनेक्शन, फायरमन लेडी खासदाराच्या जर्मनीतील 7 फेऱ्यांमुळे भारतात खळबळ
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement