2 ऑगस्टला संपूर्ण जग काळोखात बुडणार, पृथ्वीवरील 100 वर्षांनंतरची अद्वितीय घटना; शास्त्रज्ञही थक्क
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Tare Total Solar Eclipse: 2 ऑगस्ट 2027 रोजी जग एक अद्वितीय खगोलशास्त्रीय घटनेचा साक्षीदार होणार आहे. पूर्ण सूर्यग्रहण! तब्बल ६ मिनिटं संपूर्ण आकाश अंधारात झाकलं जाईल आणि ही घटना पुढील 100 वर्षांत पुन्हा दिसणार नाही.
मुंबई: जर दिवसा अचानक रात्रीसारखं अंधार पडलं आणि संपूर्ण जग काळोखात बुडालं तर? तेही तब्बल 6 मिनिटांसाठी! होय, ही कल्पना नसून 2 ऑगस्ट 2027 रोजी घडणाऱ्या पूर्ण सूर्यग्रहणाचं हे वास्तव आहे. या दिवशी जगाच्या विविध भागांमध्ये पूर्ण सूर्यग्रहण दिसेल आणि त्यामुळे दिवसा आकाशात अंधार पसरेल. विशेष म्हणजे असं विलक्षण सूर्यग्रहण पुढील 100 वर्षांतही दिसणार नाही.
हे सूर्यग्रहण इतकं दुर्मिळ आहे की याला महान उत्तर आफ्रिकन सूर्यग्रहण (The Great North African Eclipse) असंही संबोधलं जातं. कारण हे सूर्यग्रहण आफ्रिकेच्या बहुतांश देशांमधून स्पष्टपणे दिसेल. सामान्यतः पूर्ण सूर्यग्रहण 3 मिनिटांपेक्षा कमी काळासाठी टिकतात. मात्र 2 ऑगस्ट 2027 रोजीचं ग्रहण पूर्ण 6 मिनिटं जगाच्या अनेक भागांना अंधारात ठेवणार आहे.
advertisement
कुठून कुठून दिसणार हे ग्रहण?
या सूर्यग्रहणाची सुरुवात अटलांटिक महासागरापासून होणार आहे. त्यानंतर जिब्राल्टरचा जलसंधी, दक्षिण स्पेन, उत्तर मोरोक्को, उत्तर अल्जेरिया, उत्तर ट्युनिशिया, उत्तरेकडील लीबिया, ईजिप्त (मिसर), सूडान, दक्षिण-पश्चिम सौदी अरेबिया, येमेन, सोमालिया, आणि अरब देशांमधील इतर प्रांतांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. मात्र जेव्हा हे हिंद महासागरावर पोहोचेल तेव्हा ते थोडंफार धुसर होईल.
advertisement
इतिहासातील सर्वात दीर्घ पूर्ण सूर्यग्रहण इ.स.पू. 743 मध्ये 7 मिनिटं 28 सेकंदाचं होतं. त्या तुलनेत हे ग्रहण देखील एक अद्वितीय आणि विस्मयकारक खगोलीय घटना मानली जाते.
एवढं लांब सूर्यग्रहण का होणार?
-इतकं लांबट सूर्यग्रहण होण्यामागे तीन मुख्य खगोलीय कारणं आहेत:
-पृथ्वी सूर्यमालेच्या अपसौर बिंदूवर असेल, म्हणजे पृथ्वी सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर असेल. त्यामुळे सूर्य आपल्याला छोटा दिसेल.
advertisement
-चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. ज्यामुळे चंद्र मोठा आणि स्पष्ट दिसेल.
-चंद्राची सावली थेट भूमध्यरेषेवर पडणार. यामुळे सावली हळूहळू पुढे सरकते आणि अंधार अधिक वेळ टिकतो.
2 ऑगस्ट 2027 रोजीचं सूर्यग्रहण केवळ एक खगोलीय घटना नसेल तर ते पिढ्यांनी अनुभवावं असं दुर्मीळ दृश्य असेल. पुढचं असं ग्रहण 2114 मध्ये होणार आहे. त्यामुळे ही संधी गमावणं म्हणजे खरंच पश्चात्तापाच ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
2 ऑगस्टला संपूर्ण जग काळोखात बुडणार, पृथ्वीवरील 100 वर्षांनंतरची अद्वितीय घटना; शास्त्रज्ञही थक्क