Independence Day 2025: मुंबईत महात्मा गांधीजी याच ठिकाणी वास्तव्याला होते, या ठिकाणचं नाव माहितीये का?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Independence Day 2025: दीर्घकाळ चालेल्या स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं योगदान अतुलनीय आहे. त्यांनी स्विकारलेला अहिंसेचा मार्ग आणि सत्याग्रहाच्या चळवळींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.
मुंबई: यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या देशाच्या दीर्घकाळ चालेल्या स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं योगदान अतुलनीय आहे. त्यांनी स्विकारलेला अहिंसेचा मार्ग आणि सत्याग्रहाच्या चळवळींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. या स्वातंत्र्य चळवळीत मुंबईतील एका ठिकाणाचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. 'मणी भवन' असं वास्तूचं नाव असून याच ठिकाणी महात्मा गांधी अनेक वर्षे वास्तव्यास होते. याच वास्तूमध्ये गांधीजींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
ग्रँट रोडजवळील शांत गल्लीत वसलेलं मणी भवन 1917 ते 1934 या काळात गांधीजींचं मुंबईतील निवासस्थान होतं. स्वातंत्र्य संग्रामातील अनेक ऐतिहासिक चळवळींना याच ठिकाणाहून दिशा मिळाली. सत्याग्रह, असहकार आंदोलन, खेड्यांच्या पुनरुत्थानाची योजना यांसारखे अनेक महत्त्वाचे विचार याच वास्तूत आकाराला आले होते.
advertisement
स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यास इच्छुक असलेल्या किंवा इतिहासाची आवड असलेल्या व्यक्तींनी आवर्जन याठिकाणाला भेट दिली पाहिजे. कारण, याठिकाणी गांधीजींच्या जन्मापासून ते त्यांच्या हौतात्म्यापर्यंतच्या जीवनप्रवासाचं तपशीलवार दर्शन घडतं. विशेष म्हणजे, याठिकाणी गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना थ्री-डी मॉडेल्सच्या सहाय्याने प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मॉडेल्सबसून आपण प्रत्यक्ष स्वातंत्र्य संग्रामाचा भाग असल्यासारखं वाटतं.
advertisement
मणी भवनात गांधीजींच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रसिद्ध चरखा, जेलमध्ये असताना वापरलेली जेवणाची कटोरी आणि चमचा, त्यांच्या आयुष्याशी निगडित साध्या पण ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गोष्टी यांचा समावेश होतो. गांधीजी नेहमी ज्या ठिकाणी बसून सभा घेत असत ते ठिकाण आजही तसेच आहे. मणी भवनात विविध दुर्मीळ छायाचित्रं, पुस्तकं आणि स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाच्या दस्तऐवजांचा संग्रह पाहायला मिळतो. मणी भवन हे केवळ एक स्मारक नसून, ते महात्मा गांधींच्या विचारांचं आणि कार्याचं जिवंत केंद्र आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 14, 2025 4:17 PM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
Independence Day 2025: मुंबईत महात्मा गांधीजी याच ठिकाणी वास्तव्याला होते, या ठिकाणचं नाव माहितीये का?









