Independence Day 2025: मुंबईतील ‘नाना चौक’नव्हे एक पवित्र ठिकाण, या वास्तूचं महत्त्व तुम्हाला माहितीये का?

Last Updated:
Independence History: आपल्या शहराच्या दैनंदिन गर्दीत आणि गगनचुंबी इमारतींमध्ये हरवून गेलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. त्यापैकीच एक वास्तू मुंबईतील नाना चौकात आहे. ही वास्तू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं काही काळासाठी निवासस्थान होती.
1/5
स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते तर थोर विचारवंत, साहित्यिक आणि सामाजिक सुधारक म्हणूनही ओळखले जातात. ब्रिटिश सत्तेविरोधात लढताना त्यांनी अनेक क्रांतिकारक चळवळींमध्ये सहभाग घेतला. त्यांचा काही काळ मुंबईतील नाना चौकातील या वास्तूत गेला होता.

advertisement
2/5
याच वास्तूत त्यांनी काही काळासाठी विश्रांती घेतली होती तसेच काही क्रांतिकारी विचारांची मांडणीही केली होती. या वास्तूचा इतिहास ऐकताना आजही अंगावर काटा येतो. एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या सावरकरांच्या घराबाबत आजच्या पिढीला माहिती नाही.

3/5
या वास्तूत सावरकरांशी संबंधित काही वस्तू देखील आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. सावरकरांच्या हस्ताक्षरातील पत्र, वापरलेली शाईची डबी आणि एक जुनी होल्डाल इत्यादी वस्तू आजही तिथे बघायला मिळतात.

4/5
सावरकर सदानातील या वस्तूंना पाहताना इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा राहतो. सावरकरांनी आपल्या जहाल विचारांनी अनेकांच्या मनात देशक्तीची ज्वाला प्रज्वलित केली होती. त्यामुळे त्यांचं वास्तव्य असलेल्या वास्तूबाबत जनजागृती होण्याची गरज आहे.

5/5
79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अशा ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणांबद्दल माहिती असणे, ही काळाची गरज आहे. जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या थोर पुरुषांनी वास्तव्य केलं अशा जागा केवळ दगडधोंड्याच्या रचना नसून पवित्र ठिकाणं आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement