advertisement

रात्रीचा तो फोन कॉल अन् लिपिकाची घाणेरडी मागणी; महापालिकेतील महिला कर्मचारी हादरली; कल्याणमधील संतापजनक प्रकार

Last Updated:

Kalyan News : डोंबिवलीतील केडीएमसीमध्ये महिला कर्मचाऱ्याला धमकी देत अयोग्य मागणी केल्याचा आरोप एका लिपिकावर झाला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

केडीएमसीमध्ये महिला कर्मचाऱ्याला धमकी देत अयोग्य मागणी केल्याचा आरोप एका लिपिकावर झाला आहे.
केडीएमसीमध्ये महिला कर्मचाऱ्याला धमकी देत अयोग्य मागणी केल्याचा आरोप एका लिपिकावर झाला आहे.
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला अतिशय धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. महापालिकेतील लिपिक भूषण पाटील याने महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढण्याची धमकी देत तिच्याकडे अयोग मागणी केल्याचा आरोप समोर येत आहे.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांपूर्वी कामाच्या कारणावरुन आरोपी पाटील आणि संबंधित महिला यांच्यात वाद झाले होते. त्यातच पाटीलने सर्वांसमोर महिलेला शिवीगाळ केली होती. काही दिवस गेल्या आणि 20 फेब्रुवारीच्या रात्री पाटीलने त्या महिलेला फोन द्वारे संपर्क केला.
फोनवर बोलणं तरी काय झाल?
पाटीलने फोनवर बोलताना त्या महिलेला सांगितले की,तिच्यासह अजून एका कर्मचाऱ्याला नोकरीवरु काढण्याचे मला आदेश मिळालेले आहेत. ''दुसऱ्या कर्मचाऱ्याने माझ्यासोबत सेटलमेंट केली आहे, तू काय करणार?'' असे विचारत त्याने तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, नोकरीवरुन काढण्याची ऑर्डर रद्द करुन ती नोकरी टिकवून ठेवण्यासाठी पाटीलने महिलेकडे लैंगिक संबंधाची मागणी केल्याचा आरोपी आहे.
advertisement
सर्व घटनेनंतर पीडित महिलेने मानपाडा पोलिस ठाणे गाठत पाटीलविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी भूषण पाटीलविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु केल्या. या प्रकरणानंतर आरोपीवर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
रात्रीचा तो फोन कॉल अन् लिपिकाची घाणेरडी मागणी; महापालिकेतील महिला कर्मचारी हादरली; कल्याणमधील संतापजनक प्रकार
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement