advertisement

प्रवाशाच्या काळजाचा ठोका चुकला, पण रेल्वे कर्मचाऱ्यानं चेहऱ्यावर परत आणलं हसू; कल्याण स्टेशनवरचा हृदयस्पर्शी प्रसंग

Last Updated:

Kalyan Railway Staion News : कल्याण रेल्वे स्थानकात सापडलेल्या बॅगेत 12 हजार रुपये रोख आणि 4 लाखांचे दागिने आढळले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आरपीएफच्या मदतीने प्रवाशाचा शोध घेऊन सर्व साहित्य सुरक्षित परत केले.

News18
News18
कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर आले आहे. स्थानक परिसरात सापडलेल्या एका बॅगेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने आढळून आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ही बॅग हरवलेल्या प्रवाशाचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांची मालमत्ता परत केली.
मदतीला धावून आला देवमाणूस
मिळालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी रोजी कल्याण रेल्वे स्थानकात मुख्य बुकिंग क्लार्क राहुल कुमार यांना त्यांच्या कार्यालयाजवळ एक जॅकेट आणि एक बॅग आढळून आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ कर्तव्यावर असलेले उपस्थानक व्यवस्थापक उमेश विश्वकर्मा यांना याची माहिती दिली. त्यानंतर उपस्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही बॅग उघडण्यात आली.
advertisement
बॅग तपासणीदरम्यान त्यामध्ये 12 हजार 60 रुपये रोख रक्कम तसेच अंदाजे 4 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले. इतकी मोठी रक्कम आणि मौल्यवान वस्तू सापडूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोणताही उशीर न करता संबंधित प्रवाशाचा शोध सुरू केला.
आरपीएफच्या मदतीने बॅगेतील माहितीच्या आधारे प्रवाशाचा शोध घेण्यात आला. अखेर हा प्रवासी कसारा येथून सापडला. आवश्यक चौकशी आणि ओळख पटवल्यानंतर संबंधित प्रवाशाला त्यांची संपूर्ण रक्कम आणि दागिने सुरक्षितपणे परत करण्यात आले.
advertisement
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, मध्य रेल्वेच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
प्रवाशाच्या काळजाचा ठोका चुकला, पण रेल्वे कर्मचाऱ्यानं चेहऱ्यावर परत आणलं हसू; कल्याण स्टेशनवरचा हृदयस्पर्शी प्रसंग
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement