advertisement

Kalyan News : कल्याण हादरलं! स्टेशनबाहेरून जात असताना पोलिसासोबत घडलं विपरीत; मुजोर रिक्षाचालकाला बेड्या

Last Updated:

Kalyan Crime News : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालकाने पोलिस राहुल आनंद राठोड यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. यात राठोड गंभीर जखमी झालेले आहेत.

News18
News18
कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर पोलिसांवर रिक्षाचालकाने हल्ला केला. मुंबई पोलीस दलातील राहुल आनंद राठोड हे पोलिस अधिकारी स्थानकाजवळ तिकीट काढत असताना रिक्षा चालकाने त्यांना गंभीर जखमी केले.
कल्याण स्थानकाबाहेर रिक्षाचालकाची गुंडगिरी
मिळालेल्या माहितीनुसार, राठोड हे रिक्षा वाहनतळाच्या बाजूने प्लॅटफॉर्मकडे जात होते. त्यावेळी लक्ष्मण कसबे नावाचा रिक्षाचालक रस्त्यावरून वेगाने जात होता. राठोड यांनी नियम पाळण्यासाठी त्याला जाब विचारला असता कसबे रागावला. रिक्षामधील लाकडी दांडका काढून त्याने राठोड यांच्या डोक्यावर मारले.
पोलिस गंभीर जखमी
हल्ल्यामुळे राठोड गंभीर जखमी झाले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली असून तपास सुरू आहे.
advertisement
कल्याण परिसरातील नागरिक आणि प्रवाशा या घटनेने घाबरले आहेत. पोलिसांनी सर्व रिक्षा चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे आणि नागरिकांनी अशा प्रकारच्या वागणुकीपासून सावध राहावे असे सांगितले. या घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षा आणि पोलिसांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. हल्ला केलेल्या रिक्षाचालकाविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीसांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : कल्याण हादरलं! स्टेशनबाहेरून जात असताना पोलिसासोबत घडलं विपरीत; मुजोर रिक्षाचालकाला बेड्या
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement