advertisement

डोंबिवली-टिटवाळाकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार, रिंग रोड प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट

Last Updated:

Kalyan Ring Road project Update : कल्याण रिंग रोड प्रकल्प कल्याण,डोंबिवलीसह अन्य काही शहरांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. नक्की या प्रकल्पाचे काम किती टक्के पूर्ण झाले आहेत जे जाणून घेऊयात.

Kalyan Ring Road project Update
Kalyan Ring Road project Update
कल्याण : कल्याण शहरासह डोंबिवली आणि टीटवाळा या भागाचा रस्ते विकास करण्यासाठी रिंग रोड हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नुकतच या मार्गाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी सुधारणा
कल्याण रिंग रोड प्रकल्पाचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले असून त्यामुळे डोंबिवली ते टिटवाळा हा प्रवास लवकरच अधिक सोपा आणि कमी वेळेत होणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येणारा हा रिंग रोड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
आठ टप्प्यांत पूर्ण होणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
हा प्रकल्प एकूण आठ टप्प्यांमध्ये राबवण्यात येत असून त्यापैकी पाच टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. राहिलेल्या तीन टप्प्यांची कामे सध्या सुरू असून ती वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली आणि टिटवाळा यांच्यातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने हा मार्ग नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
advertisement
मोठागाव-गोविंदवाडी रोड वाहनचालकांसाठी खुला
मोठागाव ते गोविंदवाडी रोड या तिसऱ्या टप्प्याच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहनचालकांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र टप्पा एक अंतर्गत हेदुटणे ते शिळ रोड या मार्गासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन अद्याप सुरू आहे.
प्रकल्पाचा दुसरा टप्पा-शिळ रोड ते मोठागाव ब्रिज मार्ग
दरम्यान टप्पा दुसरा म्हणजेच शिळ रोड ते मोठागाव ब्रिज या नियोजित मार्गात भूसंपादनास अनेक अडथळे येत आहेत. स्थानिक अडचणी आणि तांत्रिक कारणांमुळे या टप्प्याच्या कामास उशीर होत असून त्यामुळे या मार्गाचे नव्याने आरेखन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि आसपासच्या भागातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची शक्यता असून नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्चही कमी होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
डोंबिवली-टिटवाळाकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार, रिंग रोड प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement