कल्याणमधील वर्दळीचा पूल बंद राहणार, 20 दिवस वाहतूक ठप्प, का आणि कधी? पर्यायी मार्ग

Last Updated:

Kalyan News: नाताळच्या सुट्टीत कल्याणमधील वर्दळीचा पूल 20 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.

Kalyan News: कल्याणमधील वर्दळीचा पूल बंद राहणार, 20 दिवस वाहतूक ठप्प, का आणि कधी? पर्यायी मार्ग
Kalyan News: कल्याणमधील वर्दळीचा पूल बंद राहणार, 20 दिवस वाहतूक ठप्प, का आणि कधी? पर्यायी मार्ग
कल्याण: कल्याणकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण पश्चिम आणि पूर्वेला जोडणारा महत्त्वाचा पूल 20 दिवस बंद राहणार आहे. वालधुनी उड्डाणपुलाच्या डांबरीकरण आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आले असून 20 डिसेंबर ते 10 जानेवारी 2026 पर्यंत हा पूल वाहतुकीस बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी माहिती दिली आहे.
शाळांना असणारी नाताळची सुट्टी लक्षात घेऊन दुरुस्तीचे नियोजन केले आहे. वाहतूक विभागाने पर्यायी रस्ते मार्गाचे नियोजन करून या कामासाठी पालिकेला परवानगी दिली. त्यानंतर पालिकेचे ठेकेदार शहा इंजिनिअर कंपनीने हे काम हाती घेतले आहे. सर्वाधिक वर्दळीचा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने कल्याण शहरातून पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
advertisement
कल्याण पूर्वेकडून पर्यायी मार्ग
याकाळात कल्याण पूर्वेकडून स्व. आनंद दिघे पुलावरून कल्याण पश्चिमेकडे वालधुनी पुलावरून येणाऱ्या सर्व वाहनांना सम्राट चौक (डॉ. आंबेडकर चौक) येथे ‘प्रवेश बंद’ केला आहे. ही वाहने सम्राट चौकात उजवे वळण घेऊन पुढे शांतीनगर उल्हासनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
उल्हासनगरमधून पर्यायी मार्ग
उल्हासनगरहून वालधुनी पुलावरून कल्याण पश्चिमकडे येणाऱ्या सर्व वाहनांना सम्राट चौकात ‘प्रवेश बंद’ करून, डावीकडे वळून पुढे स्व. आनंद दिघे पुलावरून इच्छित स्थळी पाठवले जाईल.
advertisement
कल्याण पश्चिमकडील पर्यायी मार्ग
कल्याण पश्चिम वालधुनी पुलावरून सम्राट चौकामार्गे उल्हासनगर आणि स्व. आनंद दिघे पुलावरून कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात ‘प्रवेश बंद’ करून, सरळ पुढे, कर्णिक रोड, प्रेम ऑटो येथे उजवीकडे वळून शहाड पुलामार्गे पाठवले जाईल.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
कल्याणमधील वर्दळीचा पूल बंद राहणार, 20 दिवस वाहतूक ठप्प, का आणि कधी? पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात,  निकालाचा पहिला कल काय?
राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू, निकालाचा पहिला क
  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

View All
advertisement