मंदिर, दवाखाना, स्थानकं, सगळीकडे शोधलं पण निराशाच; अखेर 9 वर्षांपूर्वी गायब झालेली ती अचानक दारात उभा दिसली अन्...
Last Updated:
Missing Girl Found : सध्या एका वडिल आणि मुलीची चक्क नऊ वर्षांनी भेट झाली आहे. नेमकी ही भेट कधी झाली ते जाणून घेऊयात.
टिटवाळा : बाप-लेकीचं नातं हे इतर सगळ्या नात्यांपेक्षा खास असतं. अशाच एका वडिलांची लाडकी मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एका फोन कॉलमुळे दोघांची पुन्हा भेट झाली. ही घटना नेमकी कधी घडली आणि मुलीबाबतची माहिती वडिलांना कशी मिळाली याचा सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नऊ वर्षांपूर्वी हरवलेली मुलगी अखेर सापडली
नऊ वर्षांपासून हरवलेल्या लेकीची वाट पाहणाऱ्या एका वडिलांची प्रतीक्षा अखेर संपली. रस्त्यावर भटकलेली, मानसिक आजाराशी झुंज देणारी मुलगी पुन्हा एकदा वडिलांच्या समोर उभी राहिली आणि दोघांनाही अश्रू अनावर झाले. हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. यासाठी होप पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, चेन्नई, कर्जत येथील श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन आणि टिटवाळा पोलिसांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले.
advertisement
नेमके काय घडले होते?
ही मुलगी नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मंदिर, दवाखाने, रेल्वे स्थानके, पोलीस चौक्या अशा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. अनेक दिवस लोटत गेले पण कुटुंबाची आशा कायम होती.
31 मे 2022 रोजी चेन्नईतील होप पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वयंसेवकांना ही मुलगी रस्त्यावर निराधार अवस्थेत आढळली. संस्थेने तिला तातडीने आश्रय दिला, उपचार सुरू केले आणि समुपदेशनाची प्रक्रिया राबवली. 6 जानेवारी रोजी तिला कर्जत येथील श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनमध्ये आणण्यात आले. तेथे समुपदेशनादरम्यान तिने टिटवाळ्यातील एक पत्ता सांगितला. पत्ता अचूक नसला तरी समाजसेविका नीलम राणा शिरसाठ आणि त्यांच्या पथकाने शोध थांबवला नाही.
advertisement
बाप-लेकीची गाठ घालून देणारा तो एक कॉल
अखेर टिटवाळा पोलिसांच्या मदतीने जुन्या बेपत्ता नोंदी तपासल्या गेल्या आणि मुलीच्या वडिलांचा शोध लागला. यातील एक चांगली गोष्ट म्हणजे कामाच्या निमित्ताने ते त्याच वेळी टिटवाळ्यातच उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलावले आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला सुरक्षितपणे तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 12:18 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
मंदिर, दवाखाना, स्थानकं, सगळीकडे शोधलं पण निराशाच; अखेर 9 वर्षांपूर्वी गायब झालेली ती अचानक दारात उभा दिसली अन्...








