Dombivli News : लोकलच्या गर्दीतून सुटका, डोंबिवलीतून ठाण्यासाठी थेट बस?, कसा असेल मार्ग?
Last Updated:
Dombivli News : डोंबिवलीच्या नागरिकांनी आता लोकलच्या गर्दीतून सुटका होऊ शकते कारण लवकर प्रवाशांच्या सोयीसाठी नवी योजना आखण्यात येणार आहे.
डोंबिवली : डोंबिवली लोकलमध्ये वाढत चाललेल्या गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकतीच बारावीची परीक्षा देण्यासाठी जात असताना सोहम कठरे या विद्यार्थ्याचा गर्दीत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षित आणि पर्यायी प्रवास व्यवस्थेची गरज अधिक दिसू आली आहे.
लोकलच्या गर्दीतून सुटका?
याच सर्व गोष्टींचा विचार करता भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी बुधवारी केडीएमटी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. डोंबिवली ते ठाणे दरम्यान विशेष बससेवा सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. लोकलमधील प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ही बससेवा महत्त्वाची ठरेल असे म्हात्रे यांनी सांगितले.
कसा असेल हा मार्ग?
सुचवलेल्या मार्गानुसार बस डोंबिवलीहून मोठा गाव सर्कल, मोठा गाव मानकोली पूल, मानकोली, माजिवडा सर्कल, घोडबंदर रोड असा प्रवास करून पुन्हा त्याच मार्गाने डोंबिवलीला परत येईल. हा मार्ग ठरल्यास डोंबिवली-ठाणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
advertisement
ही बससेवा लवकरात लवकर सुरू व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास लोकलवरील ताण काही प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 1:45 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli News : लोकलच्या गर्दीतून सुटका, डोंबिवलीतून ठाण्यासाठी थेट बस?, कसा असेल मार्ग?









