'ती' कधी 'आई' झाली, कधी मावशी! कामावर जाणाऱ्या माऊलींच्या लेकरांना सांभाळणाऱ्या सुप्रियांची कहाणी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:
Last Updated:
गेल्या 16 वर्षांपासून सुप्रिया यांनी सुरू केलेला पाळणाघर नोकरदार महिलांसाठी महत्त्वाचे पॉइंट ठरले आहे.
कल्याण डोंबिवली: गेल्या 16 वर्षांपासून सुप्रिया यांनी सुरू केलेला पाळणाघर नोकरदार महिलांसाठी महत्त्वाचे पॉइंट ठरले आहे. ज्या महिला सुशिक्षित आहेत, त्यांना त्यांच्या लहान मुलांमुळे बाहेर पडता येत नाहीत. अशा महिलांना सुप्रिया यांच्या पाळणाघराने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे ज्या मुलांना महागड्या ट्रिटमेंट करून सुद्धा बोलता येत नव्हतं अशा मुलांना या घराणं बोलक बनवले. शिवाय, अपंग मुलांना चालायला अधिक क्रियाशील बनवले आहे.
पाळणाघर चालू करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या पासूनच मिळाली आहे. एक वेळ होती, सुप्रिया ह्या सुशिक्षीत होत्या, परंतु त्यांच्या मुलांचे सांभाळ करणारं कोणी नव्हते आणि पाळणा घर म्हटले तर कल्याण डोंबिवली शहरात आणि तेवढ्या अंतरावर मुलांना सोडून जाणे म्हणजे कठीण तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवर अनेक नोकरदार महिलांचा विचार केला आणि एका मुलीपासून सुरू केला पाळणा घर. आज या पाळणाघराने डॉक्टर, नर्स, पोलिस अशा अनेक आईंच्या मुलांचे संगोपन केले आहे.
advertisement
कोविड काळात बहुतेक पाळणा घर बंद होते. परंतु लहान बाळांना घरी सोडण्यापासून ते 24 तास त्या मुलांचा सांभाळ करण्याचा वसा सुप्रिया यांनी यशस्वी पार पाडला होता. त्यामुळे आज त्यांना हजार मुलाच्या माता समजल्या जातात. कारण पाळणा घर ही एक जबाबदारी पेलत त्यांनी मुलांचे पालन स्वतःच्या मुलांप्रमाणे केले आहे. आज आपण अनेक घटना अशा ही बघतो जिथे मुले जबरदस्तीत राहतात. अनेक शारीरिक त्रास बाळांना होत असतो. परंतु सुप्रियाकडे असणारी मुले कुठेही बिनधास्त राहतात.
advertisement
6 महिने ते 6 वर्षांपर्यंत असणारी मुले जेव्हा 6 वर्ष होऊन जातात तेव्हा त्यांचे या पाळणा घरातून जाताना पाऊल जड होत असतात. असे सुप्रिया यांनी सांगितले. जेवढं प्रेम त्यांच्या आईवर नाही तेवढं प्रेम मुलं माझ्यावर करतात. कोणाची आई, कोणाची मावशी तर कोणाची काकी अशी विविध नावे मला एकाच वेळी ऐकायला मिळतात. त्यामुळे हे माझं पाळणाघर नसून लहान मुलांचे नंदनवन आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 16, 2025 9:21 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
'ती' कधी 'आई' झाली, कधी मावशी! कामावर जाणाऱ्या माऊलींच्या लेकरांना सांभाळणाऱ्या सुप्रियांची कहाणी









