Ulhasnagar : पाणी टंचाईच्या बातम्यांची आता काळजी नको; व्हॉट्सअॅपवरील एका क्लिकवर मिळेल पाणीपुरवठ्याची माहिती
Last Updated:
Ulhasnagar Water Supply Update : उल्हासनगर महापालिकेने पाणीपुरवठ्याची अचूक माहिती नगरसेवक आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. यामुळे पाणी कधी येणार किंवा दुरुस्तीमुळे पुरवठा बंद राहणार का याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरमधील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. नेमका हा निर्णय काय आहे आणि कशा प्रकारे नागरिकांना याचा फायदा होणार आहे, याबाबत सविस्तर अपडेट जाणून घ्या.
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आता तुमच्या खिशात
उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी कमी व्हाव्यात आणि माहिती वेळेत मिळावी यासाठी महापालिकेने नवीन पाऊल उचलले आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून पाणीपुरवठा विभागाची माहिती नगरसेवकांपर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी विशेष व्हॉट्सअॅप सेवा सुरू करण्यात आली आहे.
नेमका कोणता होणार फायदा?
या नव्या सेवेमुळे आता पाणीपुरवठा कधी होणार, दुरुस्तीमुळे पाणी बंद राहणार का? तसेच वेळापत्रकात कोणते बदल झाले आहेत याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
advertisement
महापालिकेचा अधिकृत क्रमांक जाहीर
नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचावी यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने ही व्हॉट्सअॅप सेवा विकसित केली आहे. यासाठी महापालिकेने 8454079793 हा अधिकृत मोबाईल क्रमांक निश्चित केला आहे. या क्रमांकावरून पाणीपुरवठ्याबाबतचे अधिकृत संदेश, वेळापत्रक आणि तातडीच्या सूचना पाठवण्यात येणार आहेत.
या उपक्रमामध्ये प्रत्येक परिसरासाठी पाण्याचे नियोजन, बदलांची माहिती आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच पीडीएफ स्वरूपातील अधिकृत आदेश आणि परिपत्रकेही मोबाईलवर मिळणार आहेत.
advertisement
महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय वाढवणे आणि नागरिकांना वेळेत अचूक माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठ्याची माहिती आधीच देता येईल आणि नागरिकांना त्यानुसार नियोजन करणे सोपे होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 10:59 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Ulhasnagar : पाणी टंचाईच्या बातम्यांची आता काळजी नको; व्हॉट्सअॅपवरील एका क्लिकवर मिळेल पाणीपुरवठ्याची माहिती







