advertisement

Ambernath Accident : मंगेशच्या बाबतीत नियती ठरली क्रूर! 'लवकर येतो' म्हणून घराबाहेर पडला पण...; परिसर हळहळला

Last Updated:

Ambernath Accident News : अंबरनाथ पश्चिमेकडील जांभूळ रोडवर ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

fatal truck and bike accident in Ambernath
fatal truck and bike accident in Ambernath
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेकडील जांभूळ रोडवर शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात मंगेश वाघे (वय 30) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या कामगार वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली.
पेट्रोल भरून घरी परतताना नियतीने गाठले
मंगेश वाघे हा जांभूळ परिसरात वास्तव्यास होता. शुक्रवारी दुपारी तो दुचाकीवरून पेट्रोल भरून आपल्या घरी परतत होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मंगेश थेट ट्रकच्या चाकाखाली सापडला.
अपघात इतका भीषण होता की मंगेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
advertisement
अपघातप्रकरणी ट्रक चालक ताब्यात
या अपघातामुळे जांभूळ रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील नागरिकांकडून जांभूळ रोडवर वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Ambernath Accident : मंगेशच्या बाबतीत नियती ठरली क्रूर! 'लवकर येतो' म्हणून घराबाहेर पडला पण...; परिसर हळहळला
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement