राजन साळवींविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल; उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा आरोप
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांच्याविरोधात एसीबीच्या चौकशीनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी, सचिन सावंत, प्रतिनिधी: रत्नागिरीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांच्याविरोधात एसीबीच्या चौकशीनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा 118 टक्के जास्त अपसंपदा जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आरोपीमध्ये त्यांच्या पत्नीचं आणि मुलाचं देखील नाव आहे.
आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रायगडचे एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाडावे यांनी तक्रार दिली आहे. रायगड एसीबी कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची चौकशी रत्नागिरी एसीबीचे डीवायएसपी सुशांत चव्हाण करणार आहेत. राजन साळवी यांनी 3 कोटी 53 लाखची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसबीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान आतापर्यंत एकूण सहावेळा राजन साळवी हे एसबीच्या चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आज सकाळीच त्यांच्या घरी एसबीचं पथक दाखल झालं. राजन साळवी यांच्या घराची पथकानं झडती घेतली. साळवी यांच्या घरातील वस्तूची आणि सामानाची नोंद घेण्यात आली. दरम्यान साळवी यांचे जुने घर आणि हॉटेलवरही एसबीचं पथक पोहोचलं.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
January 18, 2024 12:29 PM IST


