Raigad : अजितदादांसोबत असलेल्या नेत्याच्या घरात फूट, भावाच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात खळबळ
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शरद पवार गटाने सुनिल तटकरे यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे यांना मोठी जबाबदारी दिली. त्यांची नियुक्ती प्रदेश उपाध्यक्ष पदी करण्यात आलीय.
प्रमोद पाटील, रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानतंर खासदार सुनिल तटकरे हे अजित पवार यांच्यासोबत गेले. दरम्यान, पक्षासोबत सुनिल तटकरे यांच्या कुटुंबातही फूट पडलीय. खासदार सुनिल तटकरे यांचे भाऊ माजी आमदार अनिल तटकरे यांनी शरद पवार गटाची वाट धरली. थोरल्या भावाच्या या निर्णयाने धाकट्या भावाला मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस यांच्यासोबत महायुती केली. राष्ट्रवादीत फुट पडली आणि अनेकजण अजित पवार गटात सामील झाले. रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांना अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. यवेळी जिल्ह्यातील अनेकांनी सुनील तटकरे यांच्यासोबत जाणे पसंत केले. मात्र याला अपवाद ठरले त्यांचेच ज्येष्ठ बंधू माजी आमदार अनिल तटकरे हे राष्ट्रवादीत असले तरी त्यांनी स्थिर राहणे पसंत केले. काल त्यांनी अजित पवार गटाला अर्थात सुनील तटकरे यांनाच धक्का देत शरद पवार गटाची वाट धरली.
advertisement
शरद पवार गटाने अनिल तटकरे यांना मोठी जबाबदारी दिली. त्यांची नियुक्ती प्रदेश उपाध्यक्ष पदी करण्यात आलीय. जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. पक्षाचे रायगड प्रभारी प्रशांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून या नियुक्ती मुळे सुनील तटकरे यांच्या घरातच फूट पडल्याचे दिसून येत आहे. या नियुक्तीवेळी,सुनील तटकरे यांचे पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी आणि विरोधक आलेले शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. ही सर्व खेळी त्यांचीच असल्याचेही बोलले जात आहे. या नियुक्तीमुळे सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2024 1:25 PM IST
मराठी बातम्या/कोकण/
Raigad : अजितदादांसोबत असलेल्या नेत्याच्या घरात फूट, भावाच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात खळबळ


