Ratnagiri Heavy Rain: रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं; चिपळूण परिसरात भयावह परिस्थिती...
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं; चिपळूण परिसरात भयावह परिस्थिती...
रत्नागिरी: सध्या मान्सूनच्या पावसाने अवघं राज्य व्यापलं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडत असताना तिकडे कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मात्र पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या धुवांधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. वीजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा बऱ्याच ठिकाणी खंडीत झाला आहे. राजापूरमधील कोदवली नदीने आणि खेड मधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरकाजळी, मुचकुंदी नदी इशारा पातळीवरती वाहत आहे.
जिल्ह्यात पुरस्थिती: नदीच्या पाणी पातळ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे समुद्राला देखील उधान आले आहे. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजापूर आणि संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. तर लांजा शहर आणि उन्हाळे याठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर पाणी आले आहे.
advertisement
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून आंतरजिल्हा मार्गावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर रत्नागिरीत देखील महामार्गावर काही ठिकाणी पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. चिपळूची जगबुडी नदी इशारा पातळीतच्या जवळ पोहोचली आहे, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर परशुराम घाट परिसरात अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने शहराकडे येणारी आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
advertisement
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. काही ठिकाणी यलो, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. 10 जुलैपर्यंत बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे.
मुंबईच्या अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस कोसळतोय. दादर, कल्याण, डोंबिवलीकरांना पावसाची संततधार अनुभवायला मिळतेय. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. उद्या, 9 जुलैलासुद्धा मुंबईला पावसाचा अंदाज देण्यात आला असून इथलं कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 22°C एवढं असेल.
advertisement
पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुण्यात ढगाळ वातावरण असून काही भागात पाऊसही झाला. इथलं तापमान उद्या 30°C कमाल आणि 21°C किमान असेल. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2024 8:40 PM IST
मराठी बातम्या/कोकण/
Ratnagiri Heavy Rain: रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलं; चिपळूण परिसरात भयावह परिस्थिती...


