10 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस; पुण्यात अतिजोरदार पावसाची शक्यता!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. तर, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जातेय. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. काही ठिकाणी यलो, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. 10 जुलैपर्यंत बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे.
मुंबईच्या अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस कोसळतोय. दादर, कल्याण, डोंबिवलीकरांना पावसाची संततधार अनुभवायला मिळतेय. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. उद्या, 9 जुलैलासुद्धा मुंबईला पावसाचा अंदाज देण्यात आला असून इथलं कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 22°C एवढं असेल.
advertisement
पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुण्यात ढगाळ वातावरण असून काही भागात पाऊसही झाला. इथलं तापमान उद्या 30°C कमाल आणि 21°C किमान असेल.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात पुढचे 2 दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल. इथं वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 30°C कमाल आणि 22°C किमान तापमान असेल.
advertisement
विदर्भाला हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. इथल्या बहुतांश भागात 7 जुलैपासून पुढचे 5 दिवस पावसाची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तविली आहे. नागपूरमध्ये उद्या 35°C कमाल आणि 27°C किमान तापमान असेल. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. तर, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जातेय. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2024 7:58 PM IST