Rain Update: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार, खेडमध्ये बाजारपेठेत पाणी; वाहतूक ठप्प

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे, खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, तर मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूकीवरही विपरीत परिणाम झाला आहे.

News18
News18
 रत्नागिरी:
राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापुरात तुफान पाऊस कोसळतोय. त्यात आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे, कारण पाऊस सतत कोसळतोय.   रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडून नदीच्या पुराचे पाणी आता थेट खेड शहरांमध्ये शिरले आहे.
खेडला पुराचा धोका:
खेडच्या दगडी नदीच्या पुराचे पाणी थेट शहरात शिरले आहे. शहरातील गांधी चौक , मसिद्ध चौक, पत्रिक मोहल्ला या ठिकाणी जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. तीन ते चार तासांपासून अधिक काळ मुंबई -गोवा  महामार्ग ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अजनारी नदीवर पाण्याचे प्रमाण वाढल्याने वाहतूक प्रशासनाने  या पुलावरील वाहतूक बंद केली आहे. सध्याची वाहतूक ब्रिटिशकालीन पुलावरून होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने महामार्ग बंद केला आहे.
advertisement
रत्नागिरीला रेड अलर्ट:
रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस लगेच ओसरणार नाही, असं हवामान खात्याने आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस अधिक महत्वाचे असणार आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास याचा फटका कोकणातील रेल्वे आणि रस्ते वाहतूकीला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. तसेच चिपळूण, खेड यांसारख्या मोठ्या शहरांना पुराचा धोका देखील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती निवारण यंत्रणा आतापासूनचं सज्ज आहे.
advertisement
राज्यभरात काय परिस्थिती?
विदर्भातील नागपूरमध्ये ही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे या पावसाचा जनजीवनावरही परिणाम होत असल्याचे पाहायला मिळते आहे. पुढील 24 तास राज्यावरील पावसाचा जोर हा कायम असणार आहे. विदर्भातील 3 जिल्ह्यांना तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईत मागील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली. तर पुढील 24 तासांमध्ये मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कोकण/
Rain Update: रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार, खेडमध्ये बाजारपेठेत पाणी; वाहतूक ठप्प
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement