Konkan Railway update: 15 तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प; प्रवाशांचा खोळंबा, 3 ट्रेन रद्द
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Konkan Railway update : कोकणात ट्रेननं जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! 3 ट्रेन रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल, वेळापत्रक पाहून बाहेर पडा.
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी रत्नागिरी : राज्यात रविवार मुसळधार पावसाने कहर केला होता. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही मोठा परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे ठप्प झाली होती. तब्बल 15 तास उलटल्यानंतरही अजूनही कोकण रेल्वे ठप्पच आहे. कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी अजून काही तास लागण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे.
दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दिवाणखवटीजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल आहे. तिथला मलबा हटवण्याचे काम सुरू आहे, मात्र अति मुसळधार पावसामुळे काही अडचणी येत आहेत.
In view of the soil slippage taken place at Km 79/4-6 between Diwankhavati - Vinhere section of Ratnagiri region the following trains are cancelled.@RailMinIndia @Central_Railway @WesternRly @GMSRailway @SWRRLY pic.twitter.com/fVkGkzoLV3
— Konkan Railway (@KonkanRailway) July 15, 2024
advertisement
याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती कोकण रेल्वेनं आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. प्रवाशांना वेळापत्रक आणि ट्रेनचं स्टेटस पाहूनच बाहेर पडावं असं आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
In view of the soil slippage taken place at Km 79/4-6 between Diwankhavati - Vinhere section of Ratnagiri region the following trains are cancelled & re-diverted. @RailMinIndia @Central_Railway @WesternRly @GMSRailway @SWRRLY pic.twitter.com/1JKVdTXiQQ
— Konkan Railway (@KonkanRailway) July 14, 2024
advertisement
आजही कोकण पट्ट्यात अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने दिलं आहे. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर दुसरीकडे छोटे-मोठे नदी नाले सुद्धा धोकादायक बनले आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
advertisement
दापोली तालुक्यातील जामगे सातेरे नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याने नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने नदीपलीकडच्या सात गावांचा संपर्क तुटला आहे तर या ठिकाणची वस्तीला गेलेली एसटी अडकून पडली आहे. गेले दोन दिवस नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शाळकरी मुले तसेच रुग्णांचे हाल सुरू आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2024 7:13 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
Konkan Railway update: 15 तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प; प्रवाशांचा खोळंबा, 3 ट्रेन रद्द


