VIDEO : माकडं काय माणसालाही आकडी येईल; आंबा-काजूला वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा खतरनाक जुगाड

Last Updated:

शेतकऱ्याच्या जुगाड पाहून तुम्हालाही फुटेल घाम. आंबा-काजूपासून माकडांना दूर ठेवण्यासाठी काय केलं एकदा VIDEO पाहाच

शेतकऱ्याचा जुगाड
शेतकऱ्याचा जुगाड
शिवाजी गोरे/ रत्नागिरी : कोकणातील मुख्य पीक म्हणजे हापूस आंबा आणि काजू. मात्र हेच पीक अलीकडे संकटात सापडलं आहे. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत वानर, माकडं खाऊन नष्ट करत आहेत. यावर एका शेतकऱ्याने खतरनाक असा उपाय शोधला आहे.
प्राणी-पक्ष्यांना पिकांपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी काय काय नाही करत. कुणी स्वतः शेतीची राखण करतं, कुणी कुंपण घालतं, कुणी शेतात बुजगावणं बांधतं. पण का शेतकऱ्याने असं काही केलं आहे, ज्याचा विचारही तुम्ही केली नसेल. आंबा, काजूंपासून माकड आणि इतर प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी या शेतकऱ्याने खतरनाक असा जुगाड केला आहे. हा जुगाड असा की फक्त माकडं किंवा इतर प्राणीच नाही तर माणसांनाही भीती वाटेल. त्यांनाही घाम फुटेल.
advertisement
झाडावर आंबा ,काजू लागले की मोठ्या प्रमाणात माकडांचा, वानरांचा त्रास वाढतो. झाडावर चढून वानर फळं फस्त करतात. माणसांनी हाकलूनसुद्धा जात नाहीत. परंतु वानरांचा माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याने चक्क झाडावरच वेगवेगळ्या आवाजाचा स्पीकर बांधला आहे. यात भयानक आवाज आहेत. स्पीकर बांधल्यापासून बऱ्यापैकी फायदा होत असल्याचं शेतकरी विजय साबळे आणि विठ्ठल भटावळे यांनी म्हटलं आहे.
advertisement
याआधीसुद्धा शेतकऱ्याच्या अशाच एका खतरनाक जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फक्त काळे कपडे आणि भयानक मास्क असे पुतळे शेतात लावले होते. स्प्रिंगला लावलेल्या हँडलवर हे पुतळे अडकवण्यात आले होते. स्प्रिंग हलल्यानंतर हे पुतळे हवेत उडत होते. जणू काही भूतच हवेत उडत आहे, असं दिसत होतं.
advertisement
@rk_khan_facts इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.
तुम्हाला हे शेतकऱ्यांचे जुगाड कसे वाटले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/कोकण/
VIDEO : माकडं काय माणसालाही आकडी येईल; आंबा-काजूला वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा खतरनाक जुगाड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement