Accident : मुंबई गोवा महामार्गावर कारने दिली धडक, RTO कर्मचारी 50 फूट लांब उडाला; जागीच मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
गुरुवारी सकाळी ८ वाजता हुमरमळा इथं हा अपघात झाला. अपघातात कालिदास झणझणे यांचा जागीच मृत्यू झाला.
विशाल रेवडेकर, सिंधुदुर्ग : भरधाव कारने धडक दिल्यानं ओरोस इथल्या आरटीओ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गुरुवारी सकाळी ८ वाजता हुमरमळा इथं हा अपघात झाला. अपघातात कालिदास झणझणे यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीच्या धडकेनंतर कालिदास झणझणे हे रस्त्यापासून ५० फूट बाजूला पडले. अपघातात डोक्याला मार लागला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कालिदास झणझणे हे मूळचे साताऱ्याचे असून सध्या ते ओरोस इथं राहतात. नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेव्हा मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने झणझणे यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ते रस्त्यावरून ५० फूट अंतरावर जाऊन पडले.
गाडीची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. पोलिसांना या अपघाताबाबत कळवण्यात आले. दरम्यान, स्थानिकांनी धडक देणाऱ्या कारचालकाला अडवले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, हायवा ट्रकने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू
view commentsछत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास रोडवर एका वाहनाने तिघांना चिरडलं. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर तिघांचे मृतदेह पडले होते तर रक्तामांसाचा चिखल झाला होता. या घटनेनंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 08, 2024 12:57 PM IST
मराठी बातम्या/कोकण/
Accident : मुंबई गोवा महामार्गावर कारने दिली धडक, RTO कर्मचारी 50 फूट लांब उडाला; जागीच मृत्यू


