Rakshabandhan 2025: अवघ्या 5 रुपयांपासून आकर्षक राखी, दादर मार्केट सजलं, यंदा रक्षाबंधनचा ट्रेंड काय?

Last Updated:

Rakshabandhan: राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथून आलेल्या राख्या यावर्षी विशेष आकर्षण ठरत आहेत. काही स्टॉल्सवर हाताने बनवलेल्या राख्याही पाहायला मिळत आहेत.

+
Rakshabandhan:

Rakshabandhan: रंगीबेरंगी राख्यांनी सजलं दादर; ग्राहकांच्या उत्साहाला उधाण

मुंबई: 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना', असं बहुतांशी भाऊ-बहिणींचं नातं असतं. वर्षभर दोघांमध्ये कितीही भांडण झालं तरी रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येक भावा-बहिणीसाठी सर्वात खास असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देतो. यावर्षी, 9 ऑगस्टला (शनिवार) रक्षाबंधनाचा सण आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध दादर मार्केट रंगीबेरंगी राख्यांनी सजलं आहे.
दादर मार्केटमध्ये यंदाही राख्यांची रेलचेल बघायला मिळत आहे. रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी राख्यांचे स्टॉल्स लागले असून ग्राहकांचा उत्साह सुद्धा लक्षणीय आहे. बहिणी आपल्या भावासाठी खास राखी निवडण्यासाठी गर्दी करत असून बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. या स्टॉल्सवर अगदी 5 रुपयांपासून सुरू होणाऱ्या साध्या राख्यांपासून ते 200 रुपयांपर्यंतच्या आकर्षक डिझायनर राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये मुलींसाठी चमचमीत मोत्यांच्या राख्या, मोटू पटलू, डोरेमॉन, स्पायडरमॅन यांसारख्या कार्टून कॅरेक्टर असलेल्या लहान मुलांच्या राख्या, तसेच मोठ्यांसाठी खास चांदीच्या व कुंदन काम केलेल्या राख्यांचा समावेश आहे.
advertisement
यावर्षी एक राखी विशेष चर्चेत आहे, ती म्हणजे लबूबू राखी. जेन झी आणि तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय असलेली ही लबूबू डॉल असलेली राखी सध्या बाजारात ट्रेंडमध्ये आहे. लबूबू राखीची किंमत सुमारे 150 रुपये आहे. अनेक स्टॉल मालकांनी सांगितलं की, लबूबू राखीला यंदा खूप मागणी आहे. अनेक मुलं-मुली याच राखीच्या शोधात येत आहेत.
advertisement
व्यापाऱ्यांनी यंदा ग्राहकांच्या पसंतीचा अंदाज घेत विविध प्रकारच्या राख्यांचा साठा करून ठेवला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथून आलेल्या राख्या यावर्षी विशेष आकर्षण ठरत आहेत. काही स्टॉल्सवर हाताने बनवलेल्या राख्याही पाहायला मिळत आहेत. राखीच्या खरेदीसोबत बाजारात फुलांची, मिठाईची आणि भेटवस्तूंची दुकानंही सजली असून आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजारपेठ उत्साहाने उजळून निघालेली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Rakshabandhan 2025: अवघ्या 5 रुपयांपासून आकर्षक राखी, दादर मार्केट सजलं, यंदा रक्षाबंधनचा ट्रेंड काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement