Labubu Doll: लबूबू डॉलचा ट्रेंड आहे तरी काय? मुंबईत तर फक्त 350 रुपयांमध्ये करा खरेदी, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरलेली लबूबू डॉल विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही डॉल सध्या विशेषत झेंजी मुलांमध्ये प्रचंड ट्रेंडिंग ठरत आहे.
मुंबई: सध्या सोशल मीडियावर लबूबू डॉल प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमधील सफा सेंटरच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या चामुंडा नॉव्हेल्टी या दुकानात सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरलेली लबूबू डॉल विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही डॉल सध्या विशेषतः झेंजी मुलांमध्ये प्रचंड ट्रेंडिंग ठरत आहे.
बाजारात हजारो रुपयांना विकली जाणारी ही दर्जेदार डॉल येथे केवळ 350 रुपयांमध्ये मिळत असून, होलसेलमध्ये 310 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये ती झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या डॉलचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती 6 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक रंग वेगळा आणि लक्षवेधी आहे. ही डॉल सॉफ्ट मटेरियल आणि स्टायलिश लुकमुळे ती मुलांच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
जर तुम्ही होलसेलमध्ये खरेदी करत असाल, तर ही डॉल केवळ 310 मध्ये मिळू शकते. इथे होलसेल खरेदी करताना सहाही रंग वेगवेगळे मिळतात, जे खरेदीदारांसाठी अधिक फायदेशीर आहे. मात्र, सिंगल डॉल घेत असाल, तर रंग निवडता येणार नाही, कोणताही रंग दिला जाऊ शकतो.
advertisement
चामुंडा नॉव्हेल्टी हे दुकान सॉफ्ट टॉयज आणि गिफ्ट आयटम्ससाठी प्रसिद्ध असून, सध्या लबूबू डॉलसाठी येथे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. अनेक तरुण आणि मुलं या डॉलसोबतचे रील्स, फोटो आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करत आहेत.
झेंजी मुलांसाठी ही डॉल एक परफेक्ट गिफ्ट आयडिया ठरत आहे. तुम्हालाही ही खास लबूबू डॉल हवी असेल, तर क्रॉफर्ड मार्केटमधील सफा सेंटरच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या चामुंडा नॉव्हेल्टी या दुकानाला एकदा नक्की भेट द्या. क्वालिटी, आकर्षक किंमत आणि ट्रेंडिंग स्टाईल सगळं काही एकाच ठिकाणी!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 7:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Labubu Doll: लबूबू डॉलचा ट्रेंड आहे तरी काय? मुंबईत तर फक्त 350 रुपयांमध्ये करा खरेदी, Video

