Rakhi Shopping: रक्षाबंधनला उरले काही दिवस! भावासाठी फक्त 50 पैशांमध्ये इथं मिळतेय राखी, VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राखी पौर्णिमा हा भाऊ आणि बहिणीचे नाते दृढ करणारा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत.
जालना: राखी पौर्णिमा हा भाऊ आणि बहिणीचे नाते दृढ करणारा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. बाजारपेठ राखी दुकानांनी सजून गेली आहे. रक्षा बंधन सणाच्या पूर्वसंध्येला राखी बाजारात काय स्थिती आहे? कोणत्या राख्यांना जास्त मागणी आहे? त्यांचे दर कसे आहेत. याचा आढावा घेतला लोकल 18 प्रतिनिधीने पाहुयात.
जालना शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर राख्या दाखल झाल्या आहेत. शहरातील सिंधी बाजार राख्यांच्या दुकानांनी गजबजून गेला आहे. यंदा राख्यांच्या दरात 10 ते 10 टक्के वाढ झाली आहे. तसेच पॅंडल आणि डायमंड राखीला जास्त मागणी आहे.
advertisement
काय आहे किंमत?
view commentsत्याचबरोबर महिलांसाठी चुनरी राखीचे विविध प्रकार देखील उपलब्ध झाले आहेत. लहान मुलांसाठी कार्टून राख्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर राम नाव असलेली, भाऊ नाव असलेली, खाटू श्याम नावाची राखी देखील उपलब्ध आहे. चांदीची राखी देखील दुकानात दाखल झाली आहे. या राखीची किंमत 100 रुपये एवढी आहे. तर बाजारात 30 पैसे पासून ते 200 रुपये किमतीपर्यंत राख्या उपलब्ध आहेत, असं विक्रेते तौफिक शेख यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 05, 2025 7:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Rakhi Shopping: रक्षाबंधनला उरले काही दिवस! भावासाठी फक्त 50 पैशांमध्ये इथं मिळतेय राखी, VIDEO

