Blouse Shopping: रेडिमेड ब्लाउज, ते ही फक्त 100 रुपयांत! दादर मार्केटमधील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
पूर्वी स्त्रिया साडीसोबत आलेलंच ब्लाउज शिवून घेत होत्या. आता मात्र रेडिमेड आणि आरीवर्क केलेले ब्लाउज ट्रेंडिंग आहेत.
मुंबई: सध्या श्रावण महिना सुरू असून आता लागोपाठ अनेक सण-उत्सव साजरे करण्याची संधी मिळणार आहे. मंगळागौर, रक्षाबंधन, आणि त्यानंतर येणारा गौरी-गणपतीचा सण महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कारण, या सणांसाठी महिलांना पारंपरिक साज-शृंगार करण्याचा आनंद घेता येतो. अनेक महिलांनी तर बाजारात खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात देखील केली आहे. अनेकजणी मनसोक्त साड्यांची खरेदी करताना दिसत आहेत. आता साडी म्हटलं की त्यासोबत ब्लाउज हे आलंच. तुम्ही देखील ब्लाउज खरेदी करण्याचा किंवा ब्लाउज विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला दादरमध्ये एक स्वस्तात मस्त पर्याय उपलब्ध आहे.
पूर्वी स्त्रिया साडीसोबत आलेलंच ब्लाउज शिवून घेत होत्या. आता मात्र रेडिमेड आणि आरीवर्क केलेले ब्लाउज ट्रेंडिंग आहेत. अशा ब्लाउजला खूप मागणी आहे. त्यामुळे तुम्ही कमी गुंतवणुकीत रेडिमेड ब्लाउजचा व्यवसाय करू शकता. या व्यवसायासाठी दादर स्टेशनजवळील 'श्री राधिका ब्लाउज' या होलसेल दुकानातून तुम्ही स्टॉक खरेदी करू शकता. या दुकानात फक्त 100 रुपयांपासून सुरेख डिझाईन असलेले रेडिमेड ब्लाउज मिळतात. हे ब्लाउज सध्या बाजारात ट्रेंडमध्ये असून त्यांची फॅब्रिक क्वालिटी आणि फिनिशिंग उच्च दर्जाची आहे.
advertisement
ट्रेंडिंग ब्लाउजचे प्रकार:
कॉटन ब्लाउज: हा प्रकार श्रावणातील उपवासांच्या दिवशी घालण्यासाठी हलका आणि आरामदायक पर्याय ठरू शकतो.
चिकनकारी ब्लाउज: या प्रकारातील ब्लाउज पारंपरिक आणि एलिगंट लूक देतात.
कलमकारी ब्लाउज: युनिक आणि कलात्मक प्रिंट असलेल्या या ब्लाउजमुळे तुमच्या लूकमध्ये भर पडते
advertisement
ग्लास मिरर ब्लाउज: मंगळागौर किंवा पारंपरिक खेळांसाठी या प्रकारचे ब्लाउज उत्तम पर्याय आहेत.
पैठणी ब्लाउज: या प्रकारातील ब्लाउज पारंपरिक नऊवारी साडीवर शोभून दिसतात.
फॅन्सी नेक डिझाईन ब्लाउज: हे ब्लाउज देखील सणावाराच्या ड्रेसिंगला पूरक ठरतात.
दादर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला फक्त दोन मिनिटांवर श्री राधिका ब्लाउज हे होलसेल दुकान आहे. या दुकानात उपलब्ध असलेल्या ब्लाउजचे रंग, डिझाईन, फॅब्रिक आणि फिनिशिंग इतकी आकर्षक आणि उच्च दर्जाची आहे की ग्राहक वर्ग आपोआप खेचला जातो. सध्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या दुकानातील उत्पादनांच्या सहाय्याने तुम्ही स्वत:चा छोटा व्यवसाय सुरू करू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 5:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Blouse Shopping: रेडिमेड ब्लाउज, ते ही फक्त 100 रुपयांत! दादर मार्केटमधील हे ठिकाण माहितीये का?

