Saree Shopping Mumbai: पैठणी, महेश्वरी आणि बरंच काही, मुंबईत इथं स्वस्तात मिळेल पारंपरिक साड्यांचं कलेक्शन

Last Updated:

सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने मार्केटमधील साड्यांची दुकाने गर्दीने फुलली आहे. अनेक स्त्रिया साड्यांच्या खरेदीसाठी बाहरे पडत आहेत.

+
पैठणी,

पैठणी, महेश्वरी आणि बरंच काही, इथं स्वस्तात मिळेल पारंपरिक साड्यांचं कलेक्शन

मुंबई: 'साडी' हा बहुतांशी भारतीय स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक स्त्रीकडे स्वत:चा साड्यांचा संग्रह नक्कीच असतो. साडी हा एक पारंपरिक पोशाख असून तो शोभा, सुरेखपणा आणि सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक आहे. त्यामुळे कोणत्याही सण-उत्सवाच्या दिवशी भारतीय स्त्रिया साडी नेसण्याला प्राधान्य देतात. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने मार्केटमधील साड्यांची दुकाने गर्दीने फुलली आहे. अनेक स्त्रिया साड्यांच्या खरेदीसाठी बाहरे पडत आहेत. नवीन साड्या खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या स्त्रियांना लालबाग-परळमध्ये एक चांगला पर्याय मिळू शकतो.
लालबाग-परळ परिसरातील सुप्रसिद्ध 'प्रारंभ कलेक्शन' या होम बुटिकमध्ये श्रावण महिन्यातील मंगळागौर निमित्ताने खास नऊवारी आणि काठपदर साड्यांचे नवीन कलेक्शन दाखल झाले आहे. पारंपरिक साजशृंगारासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी हे कलेक्शन एक पर्वणी ठरणार आहे.
या दुकानातील साड्यांची किंमत 1300 रुपयांपासून सुरू होते. पेशवाई पैठणी साड्या विशेष आकर्षण ठरत आहेत. या साड्यांची किंमत दोन ते तीन हजार रुपयांदरम्यान आहे. या साड्यांमध्ये विविध आकर्षक रंग उपलब्ध आहे. याशिवाय, 'पुष्प इरकल' या प्रकाराच्या साड्या देखील दुकानात उपलब्ध आहेत. पट्टी पल्लूसह येणाऱ्या या साड्यांची किंमत दोन ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान असून, यामध्ये सध्या सुमारे 10 ते 15 रंग उपलब्ध आहेत.
advertisement
सध्या ट्रेंडिंग असलेला 'हाथी मोर' हा पॅटर्न देखील या दुकानात उपलब्ध आहे. पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक रंगसंगतीचा संगम असलेल्या या साड्यांची किंमत देखील दोन ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान असून, या प्रकारात सुमारे 10 ते 12 रंगांचे पर्याय आहेत. 'महेश्वरी' साड्यांनाही चांगली मागणी असून यामध्ये सुमारे 25 ते 30 रंग उपलब्ध आहेत. या साड्या ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाईज देखील करून दिल्या जातात. महेश्वरी साड्यांची किंमत दोन हजार, अडीच हजार आणि तीन हजार आहे. 'रागा टिश्यू' साडी फक्त 1300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
'प्रारंभ कलेक्शन'मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व पॅटर्न्समध्ये नऊवारी साड्या देखील मिळत आहेत. पारंपरिक वेशभूषेचा अनुभव देणाऱ्या या साड्या श्रावणातील मंगळागौर, हरतालिका व इतर सणांसाठी चांगला पर्याय ठरू शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Saree Shopping Mumbai: पैठणी, महेश्वरी आणि बरंच काही, मुंबईत इथं स्वस्तात मिळेल पारंपरिक साड्यांचं कलेक्शन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement