Ganpati Ornaments: मुकुट, कंठी, मोदक अन् बरंच काही, फक्त 30 रुपयांपासून ठाण्यात खरेदी करा बाप्पाचे दागिने

Last Updated:

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने फुलल्या आहेत. अनेकांनी गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या खास वस्तूंची खरेदी देखील सुरू केली आहे.

+
News18

News18

ठाणे: सर्वांचा आवडता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा देखील सजावटीच्या साहित्याने फुलल्या आहेत. अनेकांनी गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या खास वस्तूंची खरेदी देखील सुरू केली आहे. गणपतीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यास इच्छुक असेलल्या ग्राहकांसाठी ठाण्यातील एक दुकान 'वनस्टॉप डेस्टिनेशन' ठरत आहे. लोकल 18ने याबाबत सविस्तर माहिती घेतली आहे.
ठाण्यातील 'जयश्री कलेक्शन' या दुकानात अतिशय कमी दरात आकर्षक आणि परवडणाऱ्या दरात गणपती बाप्पांसाठी दागिन्यांचा संग्रह उपलब्ध आहे. या ठिकाणी केवळ 30 रुपयांपासून गणेशमूर्तीच्या दागिन्यांची खरेदी करता येऊ शकते. या ठिकाणी विविध प्रकारचे मोदक, मुकुट, कंठी, बाजूबंद, उंदीर मामा, पानसुपारी, शस्त्र अशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत.
advertisement
या दुकानात गोल्डन मोदक व डायमंड मोदक विविध आकारात उपलब्ध आहेत. मूर्तीच्या कानात घालण्याची बाळी 30 ते 150 पर्यंतच्या किमतीत मिळत आहे. याशिवाय उंदीर मामांच्या मूर्ती 150 पासून ते 700 पर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहेत. गोल्डन पानसुपारी 50 रुपयांना मिळत असून डायमंड पानसुपारीची किंमत 180 रुपयांपासून सुरू होते.
बाप्पाला अतिशय प्रिय असलेलं जास्वंदीच्या फुलाचे दर 120 ते 300 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजूबंदांची किंमत 800 रुपयांपासून सुरू होते. सोनेरी मुकुटाच्या किमती 350 रुपयांपासून तर सोंड पट्टीच्या किमती 350 रुपयांपासून सुरू होते. जास्वंदाच्या फुलांची कंठी 800 रुपयांमध्ये मिळत आहे. या दुकानात बाप्पासाठी आकर्षक शस्त्रेही उपलब्ध असून त्यांची किंमत 250 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
जयश्री कलेक्शनमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक दागिन्यांमध्ये विविध डिझाईन्स आणि प्रकार उपलब्ध आहेत. या ठिकाणी कमी किंमतीत उत्तम दर्जाचे आणि आकर्षक दागिने मिळत असल्याने या दुकानाला गणेशभक्तांची पसंती मिळत आहे. तुम्हाला देखील बाप्पाच्या सजावटीसाठी आकर्षक दागदागिने हवे असतील तर हे दुकान एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ganpati Ornaments: मुकुट, कंठी, मोदक अन् बरंच काही, फक्त 30 रुपयांपासून ठाण्यात खरेदी करा बाप्पाचे दागिने
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement