Antibiotic Overuse : तुम्हीही सतत अँटीबायोटिक घेताय? वेळीच व्हा सावध! डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या 'ही' औषधे

Last Updated:

Antibiotic Resistance India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून अँटीबायोटिक रेझिस्टन्स या गंभीर समस्येकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. स्वतःच्या मनाने औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत, असे स्पष्ट आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

अँटिबायोटिक्सचे दुष्परिणाम
अँटिबायोटिक्सचे दुष्परिणाम
मुंबई : डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेण्याची सवय ही हळूहळू आरोग्यासाठी मोठा धोका ठरत आहे. अँटीबायोटिकचा वाढता आणि अनावश्यक वापर भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. साध्या आजारांवर झटपट आराम मिळावा, या अपेक्षेने घेतली जाणारी औषधेच अनेकदा जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून अँटीबायोटिक रेझिस्टन्स या गंभीर समस्येकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. स्वतःच्या मनाने औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत, असे स्पष्ट आवाहन त्यांनी नागरिकांना केले. अँटीबायोटिकचा गैरवापर थांबवला नाही, तर भविष्यात साध्या संसर्गावरही उपचार करणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
एका अहवालानुसार भारतातील तब्बल 83 टक्के रुग्णांमध्ये मल्टिड्रग रेझिस्टन्स ऑर्गनिझम म्हणजेच बहुऔषध प्रतिरोधक जीवाणू आढळून आले आहेत. या रुग्णांवर सामान्य अँटीबायोटिकचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे उपचारांचा कालावधी वाढत असून रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
advertisement
अँटीबायोटिकच्या अतिवापरामुळे प्रतिजैविक प्रतिरोध वाढतो. परिणामी, औषधांचा परिणाम कमी होतो. याशिवाय पचनसंस्थेवर दुष्परिणाम, अलर्जी, किडनी आणि यकृतावर ताण येणे, असे विविध विकार उद्भवू शकतात. सुरुवातीला साधी वाटणारी औषधे पुढे जाऊन शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात.
सर्दी, खोकला किंवा ताप यांसारख्या किरकोळ आजारांमध्येही अँटीबायोटिक घेण्याकडे अनेकांचा कल दिसतो. “काहीही झाले की अँटीबायोटिक” ही मानसिकता वाढत चालली आहे. मात्र, या सवयीमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि हळूहळू त्या औषधांचा प्रभावही नष्ट होतो.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, जीवाणूंमध्ये प्रतिजैविक प्रतिरोध झपाट्याने वाढत आहे. अनावश्यक अँटीबायोटिक वापरामुळे हे जीवाणू अधिक तगडे बनतात आणि पुढील उपचार अधिक कठीण होतात. दहापैकी सुमारे 6 रुग्णांवर सामान्य अँटीबायोटिकचा परिणाम होत नसल्याची बाबही चिंताजनक आहे.
न्यूमोनिया आणि मूत्रमार्ग संसर्गासारख्या आजारांवर वापरली जाणारी औषधे अनेक वेळा निष्प्रभ ठरत आहेत. यामागे अँटीबायोटिकचा अतिवापर आणि चुकीचा वापर हे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत औषधांची मात्रा वाढवावी लागते, जो गंभीर धोक्याचा संकेत मानला जातो.
advertisement
लोकमतच्या वृत्तानुसार, अँटीबायोटिकचा अनावश्यक वापर जिवाणूंमध्ये प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण करतो आणि आरोग्य समस्यांमध्ये वाढ घडवतो, असे बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून औषधे घेणे टाळावे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार करावेत, हाच सुरक्षित आणि शहाणपणाचा मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Antibiotic Overuse : तुम्हीही सतत अँटीबायोटिक घेताय? वेळीच व्हा सावध! डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या 'ही' औषधे
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement