Ukadiche Modak : 'या' छोट्या छोट्या चुका टाळा, तुमचे उकडीचे मोदक होतील मऊ आणि स्वादिष्ट!

Last Updated:

Mistakes While Making Ukadiche Modak : उकडीचे मोदक बनवणं सर्वांनाच सोपं वाटत नाही. म्हणूनच आज म्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, या चुका तुम्ही टाळल्या तर तुमचेही मोदक अतिशय चविष्ट होतील, खराब होणार नाहीत आणि मऊ राहतील.

News18
News18
मुंबई : चतुर्थी असो किंवा गणपतीचा कोणताही सण. गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून आपल्याकडे पारंपारिक पदार्थ उकडीचे मोदक बनवले जातात. पूजनीय श्रीगणेशाला मोदक अतिशय प्रिय असतात. मोदक चवीने समृद्ध असतात आणि सामान्यतः गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी खास प्रसंगी बनवले जातात. मोदकांचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत आणि उकडीचे मोदक देखील त्यापैकी एक आहे. मात्र उकडीचे मोदक बनवणं सर्वांनाच सोपं वाटत नाही. म्हणूनच आज म्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, या चुका तुम्ही टाळल्या तर तुमचेही मोदक अतिशय चविष्ट होतील, खराब होणार नाहीत आणि मऊ राहतील.
मोदक बनवताना टाळा या चुका..
- फक्त पाण्यामध्ये उकड काढू नका. फक्त दूध किंवा अर्धे दूध अर्धे पाणी वापरा. त्यामध्ये थोडं लोणीही घालावं.
- रेशनचे किंवा जुने तांदूळ वापरायचे नाही. यामुळे उकडीच्या मोदकाची पारी फाटते. सुवासिक आंबेमोहोर, इंद्रायणी हे तांदूळ वापरा.
- उकड थंड होऊ द्यायची नाही. ती गरम गरम असतानाच मळून घ्यायची. उकड छान मळून घेणे गरजेचे असते.
advertisement
- उकड मळण्यासाठी ती शक्यतो कोणत्याही धातूच्या भांड्यात घेऊ नये. धातूच्या भांड्यात गरम उकड टाकल्याने तिला काळपटपणा हे टाळण्यासाठी उकड काचेच्या भांड्यात घ्यावी.
- उकडीचे छान गोळे करून त्यावर ओले किंवा सुके कापड झाकन म्हणून ठेवावे.
- मोदकाच्या कळ्या बनवून त्या एकाच दिशेने ट्विस्ट करून मोदक बनवावा, यामुळे तो छान कळीदार तयार होतो.
advertisement
- मोदक पत्रामध्ये ठेवताना ते खालच्या बाजून हलके पाण्यात बुडवून ठेवावे. जेणेकरून मोदक वाफवण्यासाठी याची मदत होते.
- पत्रामध्ये मोदक ठेवताना त्यामध्ये थोडं अंतर ठेवावं. यामुळे मोदक एकमेकांना चिकटणार नाही
- मोदकावर केशराची काडी ओली करून ठेवावी. यामुळे त्याचा छान रंग उतरतो.
- मोदक 8 मिनिटे वाफवून घ्यावे. त्यापेक्षा जास्त ते वाफवू नये. अन्यथा ते थंड झाल्यानंतर राबरासारखे लागतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ukadiche Modak : 'या' छोट्या छोट्या चुका टाळा, तुमचे उकडीचे मोदक होतील मऊ आणि स्वादिष्ट!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement