Skin Care Tips : ब्लिच केल्यानंतर 'या' चुका टाळा! नाहीतर फायद्याऐवजी होईल त्वचेचे मोठे नुकसान

Last Updated:

What to keep in mind before bleaching : पार्लरमध्ये स्किनसाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती असतात. त्यामध्ये क्लीनअप, फेशियल, ब्लिचिंग अशा अनेक ट्रीटमेंट्स आहेत. यातील ब्लिचिंग ट्रीटमेंटबद्दल आज आम्ही बोलत आहोत.

ब्लीचिंग केल्यानंतर कधीही या प्रकारच्या चुका करू नका
ब्लीचिंग केल्यानंतर कधीही या प्रकारच्या चुका करू नका
मुंबई : सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येकाचीच असतात. यासाठी बऱ्याचदा मुली पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेतात. हल्ली मुलंही आपल्या त्वचेची खूप काळजी घेतात. पार्लरमध्ये स्किनसाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती असतात. त्यामध्ये क्लीनअप, फेशियल, ब्लिचिंग अशा अनेक ट्रीटमेंट्स आहेत. यातील ब्लिचिंग ट्रीटमेंटबद्दल आज आम्ही बोलत आहोत. ब्लिचिंग केल्यानंतर मुली लहान-मोठ्या चुका करतात. यामुळे त्वचेला फायदा होण्याऐवजी ती खराब होऊ शकते.
ब्लीचिंग करण्यापूर्वी आणि नंतर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण ही रसायने तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला ब्लीचिंग केल्यानंतर टाळल्या पाहिजेत अशा चुकांबद्दल सांगणार आहोत. तर याबद्दल अधिक जाणून घ्या.
या चुका करणे टाळा
- ब्लीचमुळे त्वचेच्या अ‍ॅलर्जीची शक्यता वाढते. ब्लीचिंग हे एक प्रकारचे रासायनिक उत्पादन आहे. रसायने तुमच्या त्वचेला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकतात. याशिवाय काही महिलांना त्वचेवर खाज सुटणे, लाल डाग, जळजळ आणि सूज येऊ शकते. अशा प्रकारे, जर तुम्हाला त्वचेत या प्रकारची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा. याशिवाय जर तुम्हाला आधीच त्वचेची अ‍ॅलर्जी असेल तर तुम्ही ब्लीचिंग टाळावे.
advertisement
- ब्लीचिंग केल्यानंतर तुम्ही घराबाहेर जास्त जाऊ नये. सूर्यप्रकाश तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतो. सूर्यप्रकाशामुळे पुरळ आणि लालसरपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी ब्लीचिंगनंतर 8 ते 10 तास घरात राहणे चांगले.
- ब्लीचिंग केल्यानंतर अनेक महिला लगेच चेहरा धुतात. यावेळी जर तुम्ही फेस वॉश वापरला तर ते त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. चेहरा धुतल्याने ब्लीचचा परिणाम नाहीसा होऊ शकतो. म्हणून ब्लीचिंगनंतर फेस वॉश न वापरण्याची काळजी घ्या. यामुळे पुरळ येण्याचा धोका वाढू शकतो.
advertisement
- मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्ससारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही स्क्रब करू शकता. पण ब्लीचिंग केल्यानंतर स्क्रब करू नका. असे केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. तुम्ही ब्लिचिंगच्या आधी स्क्रब वापरू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care Tips : ब्लिच केल्यानंतर 'या' चुका टाळा! नाहीतर फायद्याऐवजी होईल त्वचेचे मोठे नुकसान
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement