Bad Food Combination : दुधात मीठ टाकून प्यायल्यास काय होते? साईड इफेक्टस वाचून थक्क व्हाल!

Last Updated:

फक्त तिखट पदार्थांमध्येच नाही तर गोड पदार्थांमध्येही काही प्रमाणात मीठ वापरले जाते. साध्या चपातीमध्येही मीठ घातले जाते. पण तुम्हाला माहित आहे का? काही पदार्थांसोबत मीठ घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

News18
News18
मुंबई : आपल्या अन्नपदार्थांतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. मिठाशिवाय जेवण खूप आणि लागते आणि असे जेवण कुणालाच आवडत नाही. फक्त तिखट पदार्थांमध्येच नाही तर गोड पदार्थांमध्येही काही प्रमाणात मीठ वापरले जाते. साध्या चपातीमध्येही मीठ घातले जाते. पण तुम्हाला माहित आहे का? काही पदार्थांसोबत मीठ घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. दूध आणि मिठ हेदेखील असेच एक घातक कॉम्बिनेशन आहे. चला पाहूया याचे दुष्परिणाम.
पोषक तत्वांनी समृद्ध गायीचे दूध आयुर्वेदात अमृत म्हणून ओळखले जाते. मुलांच्या शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी दुध आवश्यक पदार्थ असते. दुधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे आणि जन्मानंतर सुमारे 6 महिने मूल पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असते. पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपण इतर अनेक प्रकारे दुधाचे सेवन करू लागतो. दुधाचे पदार्थही खातो. अनेक वेळा लोक दुधासोबत खारट पदार्थांचे सेवन करतात. पण दुधासोबत मीठ खाणे शरीरासाठी घातक ठरू शकते.
advertisement
दूध आणि मीठ एकमेकांच्या पूर्णतः विरुद्ध..
आयुर्वेदिक एमडी डॉ. सुनील आर्य सांगतात की, आयुर्वेदात विरुद्ध आहाराची चर्चा आहे. म्हणजेच असे पदार्थ ज्यांचा स्वभाव एकमेकांपेक्षा वेगळा आहे आणि ते एकत्र सेवन करू नये. दूध आणि मीठ हे देखील अन्न विरोधी आहेत. म्हणजे हे दोन्ही एकत्र सेवन करू नये. याशिवाय दूध आणि मीठ एकत्र घेतल्याने लॅक्टोज आणि सोडियमची प्रतिक्रिया होते. या प्रतिक्रियेमुळे शरीरात त्वचेची ऍलर्जी होण्याचा धोका असतो. शरीरावर पांढरे डाग पडण्याची समस्या देखील या प्रतिक्रियेमुळे उद्भवते. याशिवाय जास्त काळ दुधासोबत मीठ खाल्ल्याने केस अकाली पांढरे होऊ शकतात.
advertisement
दुधासोबत हे पदार्थही खाऊ नका..
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मीठ आणि दूध एकत्र सेवन केल्यास शरीराच्या अनेक भागांवर नकारात्मक परिणाम होतात. हे दीर्घकाळ केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार दुधासोबत दही, मीठ, चिंच, खरबूज, नारळ, बेल, मुळा, करवंद, तीळ, तेल, सत्तू यांसारख्या गोष्टी खाणे टाळावे.
advertisement
फळांसोबत दुध घेणे ठरू शकते धोकादायक..
आयुर्वेदिक एमडी डॉ. सुनील आर्य सांगतात की, अनेकदा आपण केळी किंवा इतर फळे दुधात मिसळून शेक बनवतो आणि ते पितो. पण दुधासोबत केळी वगैरेचे सेवन करणेही योग्य नाही. त्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bad Food Combination : दुधात मीठ टाकून प्यायल्यास काय होते? साईड इफेक्टस वाचून थक्क व्हाल!
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement