Health Tips : नकली ओआरएस प्याल तर मेंदूला येईल सूज! असं ओळखा गुड क्वालिटी ORS
- Published by:Pooja Jagtap
- trending desk
Last Updated:
सध्या खूप साऱ्या बनावटी वस्तू मिळत आहेत आणि त्या ओळखणं खूप कठीण असतं. लोकांना माहीत नसल्याने ते या वस्तूंची खरेदी करतात आणि त्याचं सेवनही करतात. यापैकी काही पदार्थांमध्ये असलेली बनावट जीवघेणी ठरू शकते.
मुंबई : मार्केटमध्ये अनेक ब्रँडेड वस्तुंच्या कॉपी मिळतात. यात अगदी कपड्यांपासून ते बाटलीबंद ड्रिंक्स आणि रोजच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. अगदी औषधंही बनावट मिळतात. होय, सध्या खूप साऱ्या बनावटी वस्तू मिळत आहेत आणि त्या ओळखणं खूप कठीण असतं. लोकांना माहीत नसल्याने ते या वस्तूंची खरेदी करतात आणि त्याचं सेवनही करतात. यापैकी काही पदार्थांमध्ये असलेली बनावट जीवघेणी ठरू शकते. उन्हाळ्यात ओआरएस पावडरची मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता अशीच बनावट पावडर बनवून त्याची विक्री होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
ओआरएस पाण्यात मिसळून पिण्याचा सल्ला का दिला जातो?
डायरिया, उलट्या, जुलाब, बेशुद्ध पडणं यांसारख्या स्थितींमध्ये डॉक्टर ओआरएस पाण्यात टाकून ते पिण्याचा सल्ला देतात. हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि फ्लुईड्सचं संतुलन राखण्याचं काम करतं. त्यामुळे जर तुम्ही खऱ्याऐवजी बनावट ओआरएस पावडर पित असाल तर फायदा होण्याऐवजी तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. विशेषत: लहान मुलांवर त्याचा जास्त परिणाम होतो.
advertisement
बनावट ओआरएसमुळे उद्भवू शकतात या गंभीर समस्या
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बनावट ओआरएसमध्ये साखरचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्हाला डायरियाचा त्रास होत असेल तर ओआरएस प्यायल्याने तुमची अवस्था वाईट होऊ शकते शकते. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. बनावट ओआरएसमध्ये सोडियम देखील किमान पातळीवर असते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते. अशा परिस्थितीत तुमच्या मेंदूला सूज येऊ शकते. याशिवाय तुम्हाला इतर अनेक गुंतागुंतींना सामोरं जावं लागू शकतं.
advertisement
बनावट ओआरएस कसं ओळखायचं?
तुम्हाला बनावट ओआरएसच्या पॅकेटवर FSSAI सर्टिफिकेशन लिहिलेलं दिसू शकतं. ते फूड प्रॉडक्टच्या श्रेणीतच मार्क होईल. दुसरीकडे खऱ्या ओआरएस पावडरच्या पाकिटावर डब्ल्यूएचओचा फॉर्म्युला लिहिलेला असेल. खरे ओआरएस औषधांच्या श्रेणीत येते आणि ते स्ट्रिक्ट गाईडलाइन्स अंतर्गत तयार केलेलं असतं. त्याची गुणवत्ता राखली जाईल याची खात्री पावडर बनवताना केली जाते.
advertisement
अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही ओआरएस खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा त्याच्या पॅकेजिंगवर लिहिलेल्या सूचना, ते बनवण्यासाठी वापरलेले घटक आणि नियामक चिन्हे आवर्जून तपासा. खऱ्या ओआरएस प्रॉडक्ट्सवर क्वॉलिटी दाखविणारी वेगवेगळी लेबल असतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 20, 2024 11:16 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : नकली ओआरएस प्याल तर मेंदूला येईल सूज! असं ओळखा गुड क्वालिटी ORS


