Cancer : फक्त पुरुषांनाच टार्गेट करतो 'हा' कॅन्सर, शरीरात जाणवले 'हे' बदल तर…

Last Updated:

कर्करोगाचे वेगवेगळी लक्षण आहेत पण त्यातील काही लक्षण आहेत जी फक्त पुरुषांमध्येच दिसून येतात.

News18
News18
Warning Signs Of Prostate Cancer In Men : पुरुषामध्ये वाढत्या वयानुसार आरोग्य समस्या वाढत जातात, त्यापैकीच एक गंभीर आजार म्हणजे प्रोस्टेट कर्करोग. प्रोस्टेट ग्रंथीतील पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे हा कर्करोग होतो. सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे ओळखणे थोडे कठीण असते, कारण ती इतर सामान्य आजारांसारखीच वाटतात. पण, वेळीच ही लक्षणे ओळखल्यास आणि उपचार घेतल्यास, या आजारावर मात करणे शक्य आहे.
लघवी करताना समस्या
हे सर्वात सामान्य आणि सुरुवातीचे लक्षण आहे. यात लघवीचा प्रवाह कमकुवत होणे, लघवी सुरू करण्यासाठी ताण देणे, थांबून थांबून लघवी होणे किंवा रात्री वारंवार लघवीला जावे लागणे अशी लक्षणे दिसतात.
लघवी किंवा वीर्यतून रक्त येणे
जर तुम्हाला तुमच्या लघवीत किंवा वीर्यमध्ये रक्त दिसले, तर हे प्रोस्टेट कर्करोगाचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
वेदनेचा अनुभव
कर्करोग वाढल्यास, कमरेच्या खालच्या भागात, मांडीत किंवा नितंबांमध्ये सतत वेदना जाणवू शकतात. हाडांमध्ये पसरलेल्या कर्करोगामुळेही अशा प्रकारच्या वेदना होतात.
लैंगिक समस्या
प्रोस्टेट कर्करोगामुळे काही पुरुषांना इरेक्शन मिळवणे किंवा ते टिकवणे कठीण जाते. तसेच, स्खलन करताना वेदना जाणवू शकतात.
अचानक वजन कमी होणे
जर तुम्ही कोणताही प्रयत्न न करता, जसे की आहार किंवा व्यायामात कोणताही बदल न करता, तुमचे वजन अचानक आणि लक्षणीयरीत्या कमी होत असेल, तर हे कर्करोगाचे एक सामान्य लक्षण असू शकते.
advertisement
पाय किंवा पायाच्या बोटांना सूज
प्रगत अवस्थेत, कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो, ज्यामुळे पायांच्या लिम्फ नोड्सवर दबाव येतो आणि पायांना किंवा पायांच्या बोटांना सूज येऊ शकते. ही लक्षणे केवळ प्रोस्टेट कर्करोगाचीच नसतील, पण त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. खास करून 50 वर्षांवरील पुरुषांनी ही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान आणि योग्य उपचार हाच या आजारावर मात करण्याचा उत्तम मार्ग आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : फक्त पुरुषांनाच टार्गेट करतो 'हा' कॅन्सर, शरीरात जाणवले 'हे' बदल तर…
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement