advertisement

Heart Attack Causes : रात्री फळं खाल्ल्याने खरंच हार्ट अटॅक होऊ शकतो का? न्यूट्रिशनिस्टने सांगितलं सत्य..

Last Updated:

Heart Attack Risk Factors : रात्रीच्यावेळी फळं खाल्ल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा सोशल मीडियावर केला गेला. काही लोकांना ते सत्य वाटलं, तर काही लोकांनी मात्र हे खोटं असल्याचं सांगितलं.

रात्री फळं खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो?
रात्री फळं खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो?
मुंबई : हल्ली हृदयविकार हा शब्द किंवा हा त्रास भीतीदायक बनत चालला आहे. कारण आता कधी, कुणाला, कशा परिस्थितीत आणि कोणत्या कारणाने Heart Attack येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे याला लोक घाबरतात. म्हणून बऱ्याचदा अफवांवरही ते विश्वास ठेवतात. बऱ्याचदा आपल्याला सत्य आणि अफवा कोणती यामध्ये फरक करता येत नाही.
रात्रीच्यावेळी फळं खाल्ल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा सोशल मीडियावर केला गेला. त्यावर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांना ते सत्य वाटलं, पटलं. तर काही लोकांनी मात्र याला निव्वळ अफवा आणि हे खोटं असल्याचं सांगितलं. इंस्टाग्रामवर nutricop या अकाऊंटवरून न्यूट्रिशनिस्टने याबद्दलचं सत्य सर्वांना सांगितलं आहे.
एक व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्यामध्ये असं सांगितलं गेलंय की, रात्री फळं किंवा सॅलड खाल्ल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. याचं कारण म्हणजे फळं दिवसा ऑक्सिजन पुरवतात, तर रात्री कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. म्हणून रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात हार्ट अटॅक येतात. पण या व्हिडिओमध्ये केलेलं विधान खरंच सत्य आहे की नाही. याचा खुलासा एका न्युट्रिशनिस्टने केला आहे.
advertisement
पाहा तज्ज्ञांचं मत..
nutricop चॅनलच्या न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, रात्री फळं किंवा सॅलड खाण्याचा आणि हार्ट अटॅकचा काहीही संबंध नाही. रात्री सफरचंद किंवा कोणतंही फळ खाल्ल्याने पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. शिवाय फळं आणि भाज्या रात्री कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात, म्हणून रात्री शरीरात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. हा दावादेखील अत्यंत चूक आहे.
advertisement
न्यूट्रिशनिस्टच्यामते, हे विधान पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. हार्ट अटॅकचा धोका वाढण्याची कारणं वेगळी असतात. दीर्घकाळचा चुकीचा आहार घेणं, धूम्रपान करणं, हाय एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढणं, शरीरावर सततचा ताण, शारीरिक हालचालींचा अभाव आणि पोटाभोवती जमा झालेली जास्तीची चरबी. या सर्वांमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
advertisement
पुरुषांना हार्ट अटॅक जास्त प्रमाणात येण्याचे एक कारण त्यांच्या शरीरातील कमी इस्ट्रोजेनचं प्रमाण असू शकतं. महिलांमध्ये मेनोपॉजपूर्वी स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन रक्तवाहिन्यांचे रक्षण करते. त्यामुळे रात्रीच्यावेळी फळ खाण्याचा आणि हार्ट अटॅकचा काहीही संबंध नाही. न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, दिवसा किंवा रात्री तुम्ही 1-2 फळं खाऊ शकता. केवळ ज्यांना पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी रात्री फळं खाणं टाळावं. कारण यामुळे पोट दुखू शकतं किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack Causes : रात्री फळं खाल्ल्याने खरंच हार्ट अटॅक होऊ शकतो का? न्यूट्रिशनिस्टने सांगितलं सत्य..
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement