Diwali Shopping : लहानमूलांसाठी बनेल खास दिवाळी लूक, पारंपरिक ड्रेस फक्त 350 रुपयांत, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

दिवाळी जवळ आली की बाजारपेठा पारंपरिक कपड्यांनी फुलून जातात. महिलांसाठी साड्या, पुरुषांसाठी कुर्ते-पायजमे सहज मिळतात. पण लहानग्यांसाठी पारंपरिक पोशाख शोधणं अजूनही अनेक पालकांसाठी मोठं आव्हान असतं.

+
लहानमूलांसाठी

लहानमूलांसाठी खास दिवाळी लूक – दादरमधील स्वीट बेबी शॉपमध्ये मिळवा पारंपरिक पोशाख अगदी ३५० रुपयांपासून

मुंबई: दिवाळी जवळ आली की बाजारपेठा पारंपरिक कपड्यांनी फुलून जातात. महिलांसाठी साड्या, पुरुषांसाठी कुर्ते-पायजमे सहज मिळतात. पण लहानग्यांसाठी पारंपरिक पोशाख शोधणं अजूनही अनेक पालकांसाठी मोठं आव्हान असतं. याच समस्येचं समाधान देत आहे दादरमधील स्वीट बेबी शॉप जिथे अगदी जन्मलेल्या बाळांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी पारंपरिक आणि आकर्षक कपड्यांची भरभरून विविधता मिळते.
या दुकानात जन्मलेल्या मुलांपासून 5 वर्षांपर्यंत आणि जन्मलेल्या मुलींपासून 12 वर्षांपर्यंतचे पारंपरिक पोशाख उपलब्ध आहेत. फ्रॉक्स, नऊवारी, परकर पोलकं, धोती-कुर्ता, कुर्ता-पायजमा, डिझायनर फ्रॉक्स यांसारख्या प्रकारांची खास रेंज येथे मिळते. विशेष म्हणजे हे सर्व कपडे पैठणी, खण आणि इरकल या पारंपरिक कापडांमध्ये तयार केलेले आहेत.
advertisement
किंमतीही अत्यंत वाजवी असून फ्रॉक्स, परकर पोलकं यांची सुरुवात फक्त 350 पासून सुरू होते तर पारंपरिक पैठणी ड्रेस 750 पासून उपलब्ध आहेत. नऊवारी साड्या 350 ते 2500 या दरम्यान असून त्यामध्ये 12 विविध रंगांचे पर्याय आहेत. ग्राहकाच्या गरजेनुसार कपडे कस्टमाईज करून मिळतात, त्यामुळे उत्सवासाठी परिपूर्ण पोशाख तयार करता येतो.
स्वीट बेबी शॉप ही एक पारंपरिक पोशाखांची खास जागा असून येथे देशभरातच नव्हे तर जगभर ऑनलाइन डिलिव्हरी देखील दिली जाते. पालकांना त्यांच्या मुलांसाठी दर्जेदार, आकर्षक आणि पारंपरिक पोशाख सहज मिळावेत यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरेल असे दुकानदारांचे म्हणणे आहे. हे दुकान रानडे रोड, वामन हरी पेठेंच्या समोर डिसिल्वा हायस्कूल ग्राउंड शेजारी दादर (पश्चिम) येथे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Shopping : लहानमूलांसाठी बनेल खास दिवाळी लूक, पारंपरिक ड्रेस फक्त 350 रुपयांत, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement