Diwali Shopping : दिवाळी बनवा रंगीबेरंगी! फक्त 20 रुपये किलो दरात मिळतेय रांगोळी, खरेदीसाठी मुंबईतील हे सर्वोत्तम ठिकाण, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे आणि प्रत्येक घरात सध्या तयारीचा उत्साह दिसतोय. दारासमोर रांगोळी काढल्याशिवाय दिवाळीचा सण पूर्णच वाटत नाही.
मुंबई : दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे आणि प्रत्येक घरात सध्या तयारीचा उत्साह दिसतोय. दारासमोर रांगोळी काढल्याशिवाय दिवाळीचा सण पूर्णच वाटत नाही. पण या वर्षी जर तुम्हाला ही रांगोळी स्वस्तात आणि रंगीबेरंगी घ्यायची असेल, तर मुंबईतलं क्रॉफर्ड मार्केट तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरणार आहे.
क्रॉफर्ड मार्केटमधील सुतार गल्ली भागात सध्या रांगोळी मार्केट भरतं असून इथे फक्त 20 रुपये प्रति किलो दराने रांगोळी मिळते आहे. एवढंच नाही, तर इथे तुम्हाला 25 पेक्षा जास्त रंग मिळतात आणि ते सगळे फक्त 20 रुपये किलो या होलसेल दरात.
advertisement
जर तुम्हाला रिटेलमध्ये रांगोळी घ्यायची असेल, तर ती 25 रुपये किलो या दरात मिळते. तसेच छोट्या पॅकिंगमध्ये हवी असल्यास 250 ग्रॅमचं पॅकेट 50 मध्ये मिळतं, ज्यात तब्बल 14 वेगवेगळे रंग असतात. एवढंच नाही, तर ज्यांना थोडीच रांगोळी घ्यायची आहे त्यांच्यासाठी 10 ग्लासप्रमाणे देखील रांगोळी उपलब्ध आहे.
सुतारगल्ली मधील या बाजारात रांगोळीसोबत दिवाळी सजावटीसाठी वापरले जाणारे चमकदार ग्लिटर, पारंपरिक फुलांची डिझाईन्स आणि रंगमिश्रणासाठी वापरले जाणारे नैसर्गिक रंगद्रव्य यांचीही मागणी वाढली आहे. काही दुकानांत रांगोळी 10 ग्लासप्रमाणे विक्रीस ठेवली आहे, जे अल्प प्रमाणात रंग घेणाऱ्यांसाठी सोयीचं ठरतं.
advertisement
क्रॉफर्ड मार्केटमधील सुतार गल्ली ही दिवाळीपूर्व काळात रंग आणि सजावटीच्या साहित्याने गजबजलेली असते. दरवर्षी हजारो लोक इथून घरासाठी आणि व्यावसायिक ठिकाणांसाठी रांगोळ्या विकत घेतात. यंदा मात्र कमी किमतीत उपलब्ध असलेल्या या रंगांमुळे छोट्या व्यावसायिकांनाही आपला छोटासा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 2:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Shopping : दिवाळी बनवा रंगीबेरंगी! फक्त 20 रुपये किलो दरात मिळतेय रांगोळी, खरेदीसाठी मुंबईतील हे सर्वोत्तम ठिकाण, Video