तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे का? डोकेदुखीवर सतत पेन किलर घेणं पडेल महागात, तज्ज्ञांनीच सांगितले धोके

Last Updated:

खूप लोक या गोळ्या खाताना डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. मात्र दीर्घकाळ पेन किलरचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवू शकतात.

खूप लोक या गोळ्या खाताना डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. मात्र दीर्घकाळ पेन किलरचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवू शकतात.
खूप लोक या गोळ्या खाताना डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. मात्र दीर्घकाळ पेन किलरचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवू शकतात.
मुंबई: डोकं दुखत असेल, हात-पाय दुखत असतील किंवा शरीरात कुठेही वेदना होत असतील तर अनेकजण पेन किलर्स म्हणजे वेदनाशामक गोळ्या घेतात. खूप लोक या गोळ्या खाताना डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. मात्र दीर्घकाळ पेन किलरचे सेवन केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवू शकतात. पेन किलर औषधांचे अनेक तोटे आहेत. यासंदर्भात 'एबीपी लाइव्ह'ने वृत्त दिले आहे.

पेन किलर न घेण्याचा सल्ला देतात डॉक्टर

पेन किलरमुळे डोकेदुखी त्वरित थांबू शकते पण यामुळे दीर्घकालीन समस्या उद्भवतात. डोकं दुखत असेल तर लगेच पेन किलर घेऊ नये, त्यामुळे अनेक तोटे होतात, असा सल्ला डॉक्टर देतात. पेन किलरमुळे पोटाशी संबंधित समस्या होतात. पोट दुखणे, सूज येणे आणि इतर अनेक समस्यांना पेन किलर कारणीभूत ठरू शकते. पेन किलरचे सेवन जास्त केल्याने पोटाचा अल्सर होतो, किडनी आणि लिव्हरवर त्याचे दुष्परिणाम होतात. हृदयविकार होण्याचा धोका या गोळ्यांमुळे वाढतो.
advertisement

डोकं दुखल्यावर लगेच पेन किलर का खाऊ नये?

डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळावा यासाठी काही लोक लगेच पेन किलरचे सेवन करतात. पण 'ओव्हर द काउंटर' औषधांचे सेवन एका लिमिटमध्ये करणंच सुरक्षित असते. त्याचे जास्त सेवन करणे अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. पेन किलर किंवा कोणतेही औषध अतिप्रमाणात किंवा खूप वेळा घेतल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेण्याच्या सवयीमुळे गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ही औषधे विचारपूर्वक, डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.
advertisement

डोकं दुखल्यावर लगेच औषध घ्यायचे तोटे

  • डोकं दुखल्यावर लगेच औषध घेतल्याने पोटदुखी, अपचन अशा पोटाशी संबंधित समस्या होतात.
  • औषधांच्या ओव्हरडोसमुळे पोट, नर्व्हस सिस्टिम आणि शरीराच्या इम्युनिटीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
  • औषधांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
  • डोकेदुखीची औषधे जास्त खाल्ल्याने लिव्हर आणि किडनीवर दुष्परिणाम होतात. यामुळे भविष्यात मोठे आजार होण्याचा धोका असतो.
  • advertisement
  • डोकेदुखीमुळे जास्त पेनकिलर घेतल्याने हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो.
  • डोकं दुखल्यावर सतत पेनकिलर घेणाऱ्या लोकांना पोटाचा अल्सर होऊ शकतो. त्यामुळे पोटात जळजळ होते.
  • मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
    तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे का? डोकेदुखीवर सतत पेन किलर घेणं पडेल महागात, तज्ज्ञांनीच सांगितले धोके
    Next Article
    advertisement
    OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
      View All
      advertisement