तुमचा पार्टनर खरंच तुमच्या प्रेमात आहे की चाललाय फक्त Timepass? असं ओळखा लगेच!

Last Updated:

तुम्ही कोणाचातरी जोडीदार असण्यापूर्वी किंवा तुमचा कोणीतरी जोडीदार असण्यापूर्वी तुम्ही स्वतः स्वतःचे जोडीदार आहात. त्यामुळे स्वतःला जपा.

'रिलेशनशिप' आणि 'अफेअर' यात प्रचंड फरक आहे.
'रिलेशनशिप' आणि 'अफेअर' यात प्रचंड फरक आहे.
विशाल झा, प्रतिनिधी
गाझियाबाद : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं. एकजण रुसला की दुसऱ्याने समजूत घालावीच लागते. एकजण आजारी पडला की दुसऱ्याने काळजी घ्यावीच लागते. पण हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही एका Healthy relationship मध्ये असता. लक्षात घ्या, 'रिलेशनशिप' आणि 'अफेअर' यात प्रचंड फरक आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचा लाईफ पार्टनर म्हणत असाल, तर तुम्ही दोघं खरंच प्रेमात आहात की तुमच्यात फक्त अफेअर (एक ठराविक करार) आहे हे तुम्हाला क्लिअर असायला हवं. नाहीतर पुढे जाऊन प्रचंड मनस्ताप सोसावा लागू शकतो.
advertisement
उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबादच्या सुप्रसिद्ध रिलेशनशिप एक्स्पर्ट जीविका यांनी रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या कपल्ससाठी काही टिप्स दिल्या आहेत. आपल्या पार्टनरला अचूक ओळखता यावं आणि भविष्यात मिळणाऱ्या धोक्यापासून स्वतःला सावध करता यावं यासाठी या टिप्स महत्त्वपूर्ण आहेत.
तुमचं नातं खरंच मैत्रीपलीकडे गेलंय का?
बराच काळ एकत्र राहूनही तुम्हाला तुमचं नातं मैत्रीपलीकडचं वाटत नसेल, तर पुढे धोका आहे. कोणत्याही गोड नात्याची सुरुवात मैत्रीने होते हे खरंय, पण जोडीदार म्हणून आयुष्य सोबत घालवायचं असेल तर फक्त शरिराने नाही, दोघांनी मनानेही एक व्हायला हवंय.
advertisement
जोडीदाराच्या फ्युचर प्लॅनिंगमध्ये आहात का तुम्ही?
तुमच्यात आणि जोडीदारात भविष्याबाबत चर्चा होतच असेल. त्याच्या किंवा तिच्या बोलण्यात भविष्यातल्या घटनांमध्ये तुमचा उल्लेख येत नसेल तर पुढे धोका आहे. शिवाय बोलण्यात त्याच्या किंवा तिच्या कुटुंबियांचा उल्लेख येतोय, मित्र-मैत्रिणींचा उल्लेख येतोय पण तुमचाच उल्लेख नसेल तर हे रिलेशन पुढे नेण्यात अर्थ नाही. कारण तो तुम्हाला त्याच्या भविष्यात पाहत नाही किंवा तुम्ही भविष्यात त्याच्यासोबत नसलात तरी त्याला काही फरक पडत नाही. शिवाय जर त्याच्या बोलण्यात तुमचा किंवा कोणाचाच उल्लेख नसेल, तो वारंवार फक्त त्याच्या एकट्याच्या भविष्याबाबत बोलत असेल तर तो स्वार्थी आहे हे समजून जा.
advertisement
नात्यात तुम्ही एकटे तर नाही ना?
दोघांनाही एकमेकांसोबत राहायचंय तर दोघांनीही ते नातं सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. परंतु जोडीदाराशी बोलायला तुम्हालाच सारखा सारखा पुढाकार घ्यावा लागत असेल, त्याला तुमच्याशी बोलण्यात काही रस नाहीये किंवा या नात्यात फक्त तुमच्या एकट्याचंच अस्तित्त्व आहे असं तुम्हाला वाटत असेल तरीही पुढे धोका आहे. लक्षात घ्या, प्रेम, काळजी, विश्वास आणि ओढ दोघांकडूनही असावी लागते, एकाकडूनच असेल तर ते नातं पुढे टिकत नाही.
advertisement
ही गाठ मनाशी पक्की बांधून ठेवा.
तुम्ही कोणाचातरी जोडीदार असण्यापूर्वी किंवा तुमचा कोणीतरी जोडीदार असण्यापूर्वी तुम्ही स्वतः स्वतःचे जोडीदार आहात. त्यामुळे स्वतःला जपा. तुमचा आनंद कशात आहे, हे व्यवस्थित कळलं तरच तुम्ही तुम्हाला आनंदी ठेवणारी ती खास व्यक्ती शोधू शकाल आणि तीसुद्धा सुखात राहावी यासाठी आपसूकपणे प्रयत्न कराल. हीच बाब दोन्ही जोडीदारांना कळली म्हणजेच तुम्ही आयुष्याचे जोडीदार झालात, हे कायम लक्षात ठेवा.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा 
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुमचा पार्टनर खरंच तुमच्या प्रेमात आहे की चाललाय फक्त Timepass? असं ओळखा लगेच!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement