World`s Pure Substance: तुमच्या किचनमध्ये तयार होतो जगातला सगळ्यात शुद्ध पदार्थ, जाणून घ्या ‘या’ पदार्थाचे फायदे

Last Updated:

Benefits of eating World`s purest Desi Ghee: गाईच्या किंवा म्हशीच्या दुधावर येणाऱ्या साईला कढवून जे तूप तयार होतं ते जगातलं सगळ्यात शुद्ध तूप असतं. पारंपारिक भारतीय पद्धतीने बनवलेल्या तुपाला धर्मशास्त्रातही पवित्र मानलं गेलं आहे.

प्रतिकात्मक फोटो : ‘हा’ आहे जगातला सगळ्यात शुद्ध पदार्थ
प्रतिकात्मक फोटो : ‘हा’ आहे जगातला सगळ्यात शुद्ध पदार्थ
मुंबई: आजच्या जंकफूडच्या जमान्यात आपण सगळेच पौष्टिक आणि सात्विक अन्नापासून दूर जातो आहोत. अशातच जर कोणी आपल्याला प्रश्न विचाराला की जगातला सर्वात शुद्ध पदार्थ कोणता? तर आपल्याला त्याचं उत्तर देता येणार नाही. जर आम्ही त्या शुद्ध पदार्थाचं नाव तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की जगातला सगळ्यात शुद्ध पदार्थ हा आपल्या अनेकांच्या स्वयंपाक घरात असतो. इतकचं काय तर आपल्या घरातल्या गृहिणी  हा पदार्थ किचनमध्येच तयार करतात.

जाणून घेऊयात जगातला सगळ्यात शुद्ध पदार्थ

वर सांगितल्याप्रमाणे जगातला सगळ्यात शुद्ध पदार्थ हा आपल्या किचनमध्ये तयार होतो आणि याचं आहे नाव तूप. होय साजूक तूप. गाईच्या किंवा म्हशीच्या दुधावर येणाऱ्या सायीला कढवून जे तूप तयार होतं ते जगातलं सगळ्यात शुद्ध तूप असतं. पारंपारिक भारतीय पद्धतीने बनवलेल्या तुपाला धर्मशास्त्रातही पवित्र मानलं गेलं आहे. असं म्हणतात तुपाचे दिवे लावल्याने किंवा होम हवन करताना तुपाचा वापर केल्यामुळे आपली प्रार्थना स्वर्गात देवापर्यंत पोहचते. तुपाचं हे झालं पारंपारिक आणि आध्यात्मिक महत्त्व. मात्र या संदर्भात विज्ञान काय म्हणतं? तूप हे खरंच जगातलं सर्वात शुद्ध अन्न आहे का? या संदर्भात ज्येष्ठ आहारतज्ञ डॉ. मुक्ता वशिष्ठ काय म्हणतात ते पाहूया.
advertisement
डॉ. मुक्ता म्हणतात की, दुधाच्या सायीपासून मंद आचेवर कढवलेलं तूप हे खरंच सगळ्यात शुद्ध आहे. कारण त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते. मुख्य म्हणजे हे तूप तुम्ही स्वत: तयार करत असल्याने त्याची शुद्धता ही सर्वोत्तम असते. त्यामुळे घरी बनवलेलं साजूक तूप हे जगातलं सगळ्यात शुद्ध अन्नपदार्थ ठरतं. साजूक तुपात ब्युटीरिक ॲसिड आणि ओलेइक ॲसिड असतं. याशिवाय त्यात भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात तूप खाल्ल्यास आपल्या आरोग्याला फायदे होतात.
advertisement

जाणून घेऊयात साजूक तुपाचे आरोग्यदायी फायदे

World`s Pure Substance: तुमच्या किचनमध्ये तयार होतो जगातला सगळ्यात शुद्ध पदार्थ, जाणून घ्या ‘या’ पदार्थाचे फायदे
डॉ.मुक्ता वशिष्ठ सांगतात, साजूक तूप खाणं हे फायद्याचं असतं. त्यात असलेल्या मीडियम चेन फॅटी ॲसिडमुळे ते लगेच विरघळतं. त्यामुळे पचनही जलद होतं. तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखी चरबी विरघळणारी जीवनसत्त्वं आहेत. ही जीवनसत्त्वांचं शरीरात शोषून होण्यातही तूप खूप मदत करतं. या सर्व गोष्टी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुपामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिडही असतं. त्यामुळे आपल्या शरीराचं मुक्त रॅडिक्लस पासून संरक्षण होतं. तुपामुळे शरीर हायड्रेट राहायला मदत होते.
advertisement

तुपाचं सेवन योग्यपद्धतीने महत्त्वाचं

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांच्या मते,  जर योग्य पद्धतीने तुपाचं सेवन केलं नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. ‘तुपात शॉर्ट चेन आणि मीडियम चेन फॅटी ॲसिड असतात. त्यामुळे ते जास्त गरम केलं तर त्याची शॉर्ट चेन फॅटी ॲसिडस् तुटतात आणि ते ऑक्सिडाइज्ड होते. असं तूप खाणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. कारण ऑक्सिडाइज्ड प्रक्रियेमुळे, शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होऊन उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग इत्यादीसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तूप मंद आचेवर कढवून घ्यावं.’ याशिवाय साजूक तुपाचं मर्यादित प्रमाणात सेवन केलं तर ते आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. एका दिवसात 1 ते 2 चमचे तूप खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसान देखील होऊ शकतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
World`s Pure Substance: तुमच्या किचनमध्ये तयार होतो जगातला सगळ्यात शुद्ध पदार्थ, जाणून घ्या ‘या’ पदार्थाचे फायदे
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement