Pear Vs Indian Pear : दिसायला सारखीच पण चवीला वेगळी! बाबूगोशा आणि नाशपातीतला फरक असा ओळखा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Identify Pear And Indian Pear : ही दोन्ही फळं दिसायला अगदी सारखेच असतात. त्यामुळे ते खरेदी करताना अनेकांचा गोंधळ उडतो. या दोन्हीतील फरक ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे.
मुंबई : बाजारात फळांच्या दुकानावर बाबूगोशा आणि नाशपाती ही फळं नक्की पाहिली असतील. ही दोन्ही फळं दिसायला अगदी सारखेच असतात. त्यामुळे ते खरेदी करताना अनेकांचा गोंधळ उडतो. ही दोन्ही फळं आकाराने, रंगांने आणि दिसण्यात इतकी सारखी आहेत की सामान्य माणूस किंवा नवीन ग्राहकांचा ते एकच असल्याचा समज होतो. मात्र, ही दोन्ही फळं पूर्णपणे वेगळी आहेत. त्यांची चव आणि दोन्हीतील पोषक घटक देखील वेगवेगळे आहेत. या दोन्हीतील फरक ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे.
फळाच्या सालीवरून ओळखा फरक
बाबूगोशा आणि नाशपाती या दोन फळांमधील फरक ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्यांची साल तपासा. बाबूगोशाची साल अत्यंत मऊ आणि पातळ असते. यामुळे तुम्ही ते फळ न सोलता खाऊ शकता. याउलट नाशपातीची साल बऱ्यापैकी कडक असते. तुम्ही ते हातात घेतल्यास ते थोडी दाणेदार जाणवते. यामुळेच अनेकजण नाशपाती खाताना तिची साल काढून टाकणं पसंत करतात.
advertisement
खाताना कळतो मोठा फरक
या दोन्ही फळांच्या अंतर्गत रचनेत मोठा बदल असतो. बाबूगोशा कापल्यानंतर तो आतून लोण्यासारखा मऊ आणि भरपूर गर असलेला असतो. तो तोंडात टाकताच लवकर विरघळतो. परंतु नाशपाती खाताना ते अतिशय कुरकुरीत लागते. नाशपातीचा घास घेताना एक विशिष्ट 'कडक' असा आवाज येतो. बाबूगोशाच्या बाबतीत असा आवाज येत नाही.
गोडवा आणि चवीतील फरक
दोन्ही फळांची चव वेगळी असते. बाबूगोशा हा नाशपातीपेक्षा अधिक गोड असतो. ज्यांना जास्त गोड फळं आवडतात त्यांच्यासाठी बाबूगोशा हा उत्तम पर्याय आहे. नाशपातीमध्ये तुलनेने कमी गोडवा असतो. कधीकधी त्यात हलकासा आंबटपणा किंवा तुरटपणा जाणवू शकतो.
advertisement
पचन आणि आरोग्यदायी फायदे
बाबूगोशा मऊ असल्याने तो शरीरात लवकर विरघळतो आणि पचायला अतिशय हलका असतो. नाशपातीचा विचार केला तर त्यात बाबूगोशाच्या तुलनेत फायबरचं प्रमाण जास्त असतं. हे फायबर पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी अतिशय गुणकारी मानलं जातं. परंतु ते नीट चावून खाल्लं तर त्याचा फायदा होता.
दोन्ही फळांच्या टिकाऊपणातही फरक
या दोन्ही फळांच्या टिकाऊपणातही फरक आहे. बाबूगोशा एकदा पूर्णपणे पिकला की तो लवकर खराब होऊ लागतो. त्यामुळं तो विकत आणल्यावर फार काळ ठेवता येत नाही. याउलट नाशपाती थोडा कडक असतो. त्यामुळं तुम्ही फ्रिजमध्ये 4 ते 5 दिवस साठवून ठेवू शकता.
advertisement
खरेदी करताना कसं ओळखाल?
तुम्ही बाजारात गेल्यावर ही दोन्ही फळं हाताळूनही त्यांच्यातील फरक ओळखू शकता. फळ हाताने दाबल्यावर थोडं दबलं जात असेल आणि मऊ वाटत असेल तर तो बाबूगोशा आहे. परंतु ते फळ दगडासारखं कडक वाटत असेल, तर ती नाशपाती असते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 9:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pear Vs Indian Pear : दिसायला सारखीच पण चवीला वेगळी! बाबूगोशा आणि नाशपातीतला फरक असा ओळखा..










