दिवाळीत घर सजावटीसाठी आर्टिफिशियल फुलांच्या माळा, दादर मार्केटमध्ये 100 रुपयांपासून करा खरेदी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
दिवाळीसाठी स्पेशल मार्केटमध्ये फुलांच्या वेगवेगळ्या माळा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये सुद्धा दक्षिणात्य पद्धतीच्या फुलांच्या माळांना अधिक पसंती मिळत आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सध्या दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फुल आलेली आहेत पण झेंडूची नव्हे तर आर्टिफिशियल फुले. यंदा दिवाळी आधीच दादर मार्केटमध्ये आर्टिफिशियल फुलांची रेलचेल पाहायला मिळत आहे. दिवाळीसाठी स्पेशल मार्केटमध्ये फुलांच्या वेगवेगळ्या माळा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये सुद्धा दक्षिणात्य पद्धतीच्या फुलांच्या माळांना अधिक पसंती मिळत आहे. वेलवेट फुलांच्या माळा त्यासोबत घर सजवण्यासाठी आर्टिफिशियल फुलांचे तोरण मार्केटमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याची खरेदी तुम्ही स्वस्तात करू शकतात.
advertisement
फुलांची किंमत काय?
या आर्टिफिशियल फुलांमध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारची फुलं उपलब्ध झाली आहेत. दादर मधील खाऊ गल्ली मध्ये फुलांचे वेगवेगळे दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील. या फुलांच्या माळा तुम्हाला फक्त 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत. लोकांचा कल खऱ्या फुलांचे तोरण किंवा हार विकत घेण्याऐवजी आर्टिफिशियल फुलांकडे आहे.
advertisement
कोणते प्रकार?
खरी फुले साधारण दोन ते तीन दिवसांनी कोमेजून जातात परंतु ही आर्टिफिशल फुलं वॉशेबल असल्यामुळे वर्षानुवर्ष ती वापरता येतात आणि याच कारणाने दिवाळी खरेदी आर्टिफिशियल फुलांनी नागरिकांना आकर्षित केल आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला दक्षिणात्य पद्धतीच्या नव्या आलेल्या माळा दीडशे रुपयांपासून मिळतील तर झेंडूच्या माळा शंभर रुपयांपासून मिळतील. यामध्ये तुम्हाला मोगरा, गुलाब, झेंडू त्याही वेगवेगळ्या रंगांमध्ये अशा सगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा उपलब्ध आहेत.
advertisement
'आर्टिफिशियल फुलांच्या माळा वॉशेबल असल्यामुळे लोकांचा या माळा खरेदी करण्याकडे कल जास्त आहे. सगळेजण एकच माळ खरेदी करत नाही तर त्यासोबतच अनेक माळा खरेदी करतात. त्यामुळे या व्यवसायाला अधिक तेजी आलेली आहे. घर सजावटीसाठी हा उत्तम पर्याय लोकांना कळल्यामुळे मार्केटमध्ये सध्या याच फुलांची रेलचेल आहे.' असे विक्रेते सुलताम यांनी सांगितले.
advertisement
तुम्हालाही जर आर्टिफिशियल फुलांच्या माळा अगदी स्वस्त दरात हव्या असतील, तर आवर्जून दादर मार्केटमध्ये जा आणि मनसोक्त दिवाळीची शॉपिंग करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2024 1:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दिवाळीत घर सजावटीसाठी आर्टिफिशियल फुलांच्या माळा, दादर मार्केटमध्ये 100 रुपयांपासून करा खरेदी