पौष्टिक घरगुती फराळ हवाये पण बनवायला वेळ नाही; दादरमधील हे ठिकाण आहे तुमच्यासाठी बेस्ट!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
diwali homemade faral - वेळ नसल्याने दिवाळीला फराळ बनवण्याऐवजी बाहेरून विकत आणण्यावर अनेकांचा कल असतो. तुम्हालाही बाहेरुन अतिशय चविष्ट असा फराळ आणायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे - हल्ली अनेकांना ऑफिसच्या कामांमुळे दिवाळी घरी फराळ बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवाळीला फराळ बनवण्याऐवजी बाहेरून विकत आणण्यावर अनेकांचा कल असतो. तुम्हालाही बाहेरुन अतिशय चविष्ट असा फराळ आणायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
दादर स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या रानडे रोडवर श्री स्वामी समर्थ गृह उद्योग नावाचे दुकान आहे. याठिकाणी तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला दिवाळीचा फराळ मिळेल. या फराळामध्ये चकली, करंजी, लाडू हे पदार्थ तर आहेतच. पण त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या करंज्या, रवा, बेसन, शेंगदाणे यांचे लाडू, तांदळाच्या पिठाचे बोर हे सगळे व्हरायटीमध्ये पदार्थ अगदी स्वस्त आणि पौष्टिक पद्धतीने उपलब्ध आहेत.
advertisement
इथे तुम्हाला करंज्यांमध्ये 3 ते 4 प्रकार मिळतील. यामध्ये ओल्या खोबऱ्याच्या करंज्या, सुक्या खोबऱ्याच्या करंज्या, लेयर वाल्या करंज्या या गोष्टी उपलब्ध आहेत. इथे मिळणाऱ्या चकल्यांमध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तेलकटपणा जाणवणार नाही.
अश्विनी मेणकुरकर या हा श्री स्वामी समर्थ गृह उद्योग चालवतात. मागील 15 वर्षांपासून त्या हा व्यवसाय करत आहेत. दिवाळीच्या सणाला दिवाळी येण्याआधी 15 दिवस अगोदरच त्या हा व्यवसाय सुरू करतात. हे सगळे पदार्थ अश्विनी स्वतः घरी बनवतात. लाडू बनवतानाही त्या शुद्ध साजूक तुपाचा वापर करतात आणि लाडू वळतात. दादरकरांचा त्यांना खूप उत्तम प्रतिसाद त्यांना मिळत आहे.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्या म्हणाल्या की, 'मी गेले 15 वर्षे हा फराळ बनवत आहे. मी फराळाचा स्टॉक एकदम बनवून ठेवत नाही, तर जस लोकांची मागणी येते आणि बनवलेला फराळ संपतो, तेव्हाच मी फराळ बनवते. मी बनवलेल्या फराळामध्ये तुम्हाला फार तेल आढळणार नाही. लोकांना पौष्टिक फराळ खायला मिळेल, याकडे माझा विशेष कटाक्ष असतो,' असे अश्विनी मेणकुरकर यांनी सांगितले.
advertisement
तर मग तुम्हालाही फराळ बनवण्यासाठी वेळ नसेल आणि घरगुती फराळ कुठे बनतो याच्या तुम्ही शोधात असाल, तर तुमच्यासाठी दादर मधील हे ठिकाण बेस्ट आहे. तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.
Location :
Dadar,Raigad,Maharashtra
First Published :
October 24, 2024 1:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पौष्टिक घरगुती फराळ हवाये पण बनवायला वेळ नाही; दादरमधील हे ठिकाण आहे तुमच्यासाठी बेस्ट!