gold silver rate today : गुरुपुष्यामृताचा मुहूर्त, नाशकात चांदीने गाठला 1 लाखाचा टप्पा, तर सोनेही 80 हजारांवर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
हिंदू धर्मात विविध मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी केले जातात. आज गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर अनेक नागरिक सोने व चांदी खरेदी करता. मात्र, आजचा सोने-चांदीचा भाव नेमका काय आहे, हेच आपण जाणून घेऊयात.
मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नाशिक सुवर्णपेठेत पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे चांदीने विना जीएसटी एक लाखाचा टप्पा गाठला आहे. सोबतच सोन्याचे दरही 80 हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं चांदी खरेदी करणे मुश्किल झाले आहे.
advertisement
दिवाळी व त्यानंतरच्या लग्नसराईच्या तोंडावर देशातील सराफा बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. बुधवारी नाशिक सराफा बाजारात 24 कॅरेट सोने दरात एकाच दिवशी प्रति 10 ग्रॅममागे 800 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी सोन्याचा दर 79,500 वर (जीएसटीसह 81,885 रु.) पोहोचले. गेल्या 6 दिवसांत सोने तब्बल दीड हजार रुपयांनी महागले आहे.
advertisement
advertisement
advertisement