Health : विक्स वापरताना तुमची 'ही' एक चूक, ठरू शकते जीवघेणी; डॉक्टरांनी दिली वॉर्निंग
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजकाल प्रत्येक घरात विक्स वेपोरबचा वापर केला जातो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नॉर्मल सर्दी खोकला जाणवला की आपण छातीजवळ विक्स लावतो. पण काहीजण यात घरगुती उपाय करायचा प्रयत्न करतात.
Side Effects OF Vicks VapoRub And Camphor : आजकाल प्रत्येक घरात विक्स वेपोरबचा वापर केला जातो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नॉर्मल सर्दी खोकला जाणवला की आपण छातीजवळ विक्स लावतो. पण काहीजण यात घरगुती उपाय करायचा प्रयत्न करतात. कधीतरी घरगुती उपाय करणे हे हानिकारक ठरू शकते. डॉक्टर पवन, यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी विक्ससह कापूर किंवा इतर घरगुती पदार्थ मिक्स करून लावल्याचे साइड इफेक्ट्स सांगितले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये पालकांनी बाळाला सर्दी खोकला झाला असताना विक्स आणि कापूर एकत्र करून लावल्याने त्या बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे, तसेच हे किती धोकादायक आहे तेही स्पष्ट केले आहे.
कापूरचा डोस जास्त होतो
विक्समध्ये आधीच कापूर आणि मेंथॉल योग्य प्रमाणात असते. त्यात आणखी कापूर मिसळल्याने शरीरावर कापूरचा डोस वाढतो. ज्यामुळे शरीरातील त्याचे शोषण अधिक होते.
विषारी ठरण्याची शक्यता
कापूर जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास तो विषारी ठरू शकतो. विशेषतः लहान मुलांच्या त्वचेतून तो सहज शोषला जातो, ज्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
advertisement
लहान मुलांसाठी जीवघेणे
लहान मुलांसाठी हे मिश्रण अत्यंत धोकादायक आहे. जास्त प्रमाणात कापूर पोटात गेल्यास किंवा शरीरात शोषले गेल्यास त्यांना झटके किंवा फिट्स येऊ शकतात. विक्समध्ये आधीच कापूरचा वापर केला जातो अशात जर तुम्ही घरगुती उपाय करत असाल तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
त्वचेची जळजळ
कापूर जरी नैसर्गिकरित्या थंडावा देत असेल तरी त्याला कोणत्याही गोष्टीत मिक्स केल्यानंतर त्याचा नैसर्गिक स्वभाव बदलतो. जेव्हा विक्स आणि कापूर हे मिश्रण एकत्र केले जाते आणि त्वचेला लावले जाते तेव्हा ते त्वचेला खूप उष्णता देते. त्यामुळे, संवेदनशील त्वचेवर लावल्यास जळजळ, लालसरपणा आणि रॅशेस येऊ शकतात.
advertisement
श्वासासाठीही हानिकारक
घरात बंद खोलीत हे मिश्रण लावल्यास कापूरच्या वासाची तीव्रता वाढते, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. डॉक्टरांच्या मते, जेव्हा कापूरचे प्रमाण जास्त असते तेव्हा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे श्वसननलिकेत त्रास होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो असं डॉक्टर सांगतात.
डॉक्टरांचा सल्ला
डॉक्टरांच्या मते, विक्सचा वापर नेहमी पॅकेटवर दिलेल्या सूचनेनुसारच करावा. त्याला इतर कोणत्याही गोष्टीसोबत मिसळू नये. विशेषतः मुलांसाठी, केवळ बालकांसाठी असलेले विक्स वापरावे. कोणताही घरगुती उपाय करताना त्याचे दुष्परिणाम माहीत असणे महत्त्वाचे आहे. सुरक्षिततेसाठी नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 2:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health : विक्स वापरताना तुमची 'ही' एक चूक, ठरू शकते जीवघेणी; डॉक्टरांनी दिली वॉर्निंग