Mumbai Fire: मुंबई हादरली! गॅस सिलिंडर पाईप लीकमुळे स्फोट, सात जण गंभीर जखमी

Last Updated:

Mumbai Fire News : ऐन नवरात्रीत मुंबई उपनगरातील कांदिवली स्फोटाने हादरली. कांदिवली (पूर्व) येथील मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत आज गॅस लीक झाल्याने स्फोट होऊन आग लागली.

मुंबई हादरली! गॅस सिलिंडर पाईप लीकमुळे स्फोट, सात जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! गॅस सिलिंडर पाईप लीकमुळे स्फोट, सात जण गंभीर जखमी
विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई: ऐन नवरात्रीत मुंबई उपनगरातील कांदिवली स्फोटाने हादरली. कांदिवली (पूर्व) येथील मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत आज गॅस लीक झाल्याने स्फोट होऊन आग लागली. सकाळी लागलेल्या आगीत सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
ही घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग एक मजली असलेल्या गाळ्याला लागली. घर आणि दुकान असलेल्या गाळ्याला आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. आगीत जखमी झालेले सहा जणांची प्रक़ृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर ईएसआयसी रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement

आग कशी लागली?

घरातील वीजजोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर लिकेज् झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीत सात जण गंभीर भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि समता नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

>> आगीत जखमी झालेल्यांची नावे

advertisement
> शिवानी गांधी (51 वर्ष) - 70 टक्के भाजल्या आहेत.
> नितू गुप्ता (31 वर्ष) - 80 टक्के भाजल्या आहेत.
> जानकी गुप्ता (39 वर्ष)- 70 टक्के भाजल्या आहेत.
> मनराम कुमाकट ( 55 वर्ष) - 40 टक्के भाजले आहेत.
advertisement
> रसिका जोशी (47 वर्ष) - 90 टक्के भाजल्या आहेत.
> दुर्गा गुप्ता (30 वर्ष) - 90 टक्के भाजल्या आहेत.
> पूनम (28 वर्ष) - 90 टक्के भाजल्या आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
Mumbai Fire: मुंबई हादरली! गॅस सिलिंडर पाईप लीकमुळे स्फोट, सात जण गंभीर जखमी
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement